रामनगरातील यंदाची होळी खूप खास होती.प्रभू राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनानंतर पहिलीच होळी असल्याने अयोध्येत प्रचंड आनंदाचे वातावरण होते.आज (२५ मार्च) सकाळी विविध ठिकाणच्या लोकांनी मंदिरात पोहोचून मूर्तीवर रंग आणि गुलाल उधळला. होळीच्या दिवशी मूर्तीला रंगरंगोटी केल्यावर आनंदी झालेल्या भाविकांच्या आनंदाने संपूर्ण रामजन्मभूमी परिसर रंगांच्या सणाच्या आनंदात तल्लीन झाला होता.
राम मंदिरातील पुजाऱ्यांनी मूर्तीवर पुष्पवृष्टी केली आणि परमेश्वरासोबत होळी खेळली. यासोबतच राग भोग आणि अलंकाराचा भाग म्हणून अबीर-गुलाल देवाला अर्पण करण्यात आला.देवाला ५६ प्रकारचा नैवैद्य दाखवण्यात आला.रामललाला प्रसन्न करण्यासाठी पुजाऱ्यांनी भाविकांसह होळीची गाणी गायली. त्याचवेळी रामजन्मभूमी संकुलात रामललाच्या दर्शनासाठी आलेले भाविकही होळीच्या गाण्यांवर नाचताना दिसले.
हे ही वाचा:
मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मुईझ्झुंना सांगितले…दुराग्रह सोडा, शेजाऱ्यांशी जुळवून घ्या!
ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमर अब्दुल्लाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न!
जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची गाडी चोरीला
अलीगड, संभलमधील मशिदी ताडपत्रीने झाकल्या!
रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पीटीआयला सांगितले की, ‘रामलला मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिली होळी साजरी केली जात आहे. रामललाच्या आकर्षक मूर्तीला फुलांनी सजवण्यात आले असून कपाळावर गुलाल लावण्यात आला आहे. यावेळी रामललाच्या मूर्तीने गुलाबी वस्त्र परिधान केले होते.मोठ्या संख्येने भाविक रामललाच्या दरबारात पोहोचले आणि आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन धन्य झाले. रामललाच्या होळीसाठी मंदिराकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.