वजन कमी करण्यासाठी डबाच न खाण्याचा केजरीवाल फॉर्म्युला

‘आप’कडून होणाऱ्या वजन घटण्याच्या आरोपांवर तिहार प्रशासनाकडून स्पष्टता

वजन कमी करण्यासाठी डबाच न खाण्याचा केजरीवाल फॉर्म्युला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या दिल्ली मद्य धोरण घोटाळासंबंधी तिहार तुरुंगात आहेत. अशातच अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावल्याबद्दल आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने विविध दावे केले जात आहेत. तसेच तिहार तुरुंगातील कारभारावर टीका केली जात आहे. ‘आप’ पक्षाकडून आरोप केला आहे की, गेल्या काही दिवसांत केजरीवाल यांचे वजन आठ किलोने कमी झाले असून त्यांची शुगर लेव्हलही खूप वाढली आहे. मात्र, यावर आता तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टता देत सर्व आरोप आणि दावे फेटाळून लावले आहेत.

तिहार तुरुंग प्रशासनाने अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत काही खुलासे केले आहे. ‘आप’च्या नेत्यांकडून होत असलेले आरोप हे निराधार असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. तुरुंग प्रशासनाच्या अहवालानुसार, अरविंद केजरीवाल यांचे वजन साडेआठ किलोने कमी झालेले नाही. २ जून रोजी ते पुन्हा तुरुंगात आले तेव्हा त्यांचे वजन फक्त दोन किलोने कमी झाले होते, असं तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच केजरीवाल हे जाणूनबुजून वजन कमी करत असल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.

अहवालानुसार, १ एप्रिल रोजी जेव्हा ते पहिल्यांदा तुरुंगात आले तेव्हा त्यांचे वजन ६५ किलो होते. त्यानंतर ९ मे रोजी ते तुरुंगातून बाहेर आले त्या दिवशी त्यांचे वजन ६५ किलो होते. २ जून रोजी ते पुन्हा तुरुंगात परतले तेव्हा त्यांचे वजन ६३.५ किलो होते. त्यानंतर १४ जुलै रोजी केजरीवाल यांचे वजन ६१.५ किलो होते. यानुसार २ जून ते १४ जुलै दरम्यान त्यांचे वजन दोन किलोने कमी झाले.

अरविंद केजरीवाल हे जाणीवपूर्वक आपले वजन कमी करत आहेत, असा दावा तुरुंग प्रशासनाने केला आहे. केजरीवाल हे अनेकदा घरून आलेला डबा न खाताच परत करतात. यापूर्वी ते मुद्दाम असे पदार्थ खायचे ज्यामुळे त्यांची शुगर लेव्हल वाढेल. सध्या एम्स मेडिकल बोर्ड केजरीवाल यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीही वैद्यकीय मंडळाच्या सतत संपर्कात आहेत. ‘आप’कडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याबाबतची माहिती गृह मंत्रालय, जीएनसीटीडीला देण्यात आली आहे, अशी स्पष्टता तिहार तुरुंग प्रशासनाने दिली आहे.

हे ही वाचा:

पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, नाव बदलून यूपीएससीची दिले दोन अटेंम्प्ट !

मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !

पुण्यात ‘झिका’चा वाढता प्रादुर्भाव; २३ जणांना लागण

आषाढी एकादशीपूर्वीच वारकऱ्यांना सरकारकडून भेट; पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

दरम्यान, तिहार तुरुंगातील वैद्यकीय अहवालावर ‘आप’ पक्षाकडूनही उत्तर समोर आले आहे. संजय सिंह म्हणाले की, तिहार तुरुंगाने केजरीवाल यांच्या शरीरातील शुगर लेव्हल अनेक वेळा कमी झाल्याचे मान्य केले आहे. शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे व्यक्ती झोपेच्या वेळी कोमात जाऊ शकते. शुगर लेव्हल कमी झाल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोकाही असू शकतो.

दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, मधुमेहाने त्रस्त असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल धोकादायकरित्या खालावली आहे. भाजपाने केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्याचा कट रचला होता. त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका आहे. त्यांचे वजन साडे आठ किलोने कमी झाले आहे.

Exit mobile version