ठाणे म्युनिसिपल ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

११ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ ब्राँझपदके जिंकली

ठाणे म्युनिसिपल ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

३८व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ ही स्पर्धा १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडली. ठाणे म्युनिसिपल ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ ब्राँझपदके मिळवली.

१४ वर्षांखालील मुले – धैर्य सूर्यराव सुवर्णपदक – ट्रायथलॉन ब गट. अनिरुद्ध नंबूद्रीने ट्रायथलॉन क गटात रौप्य पदक मिळवले.

१४ वर्षांखालील मुली – रिसा फर्नांडिसने ट्रायथलॉन ब गटात रौप्यपदक मिळवले.१६ वर्षांखालील मुली – मिहिका सुर्वेने पेंटॅथलॉनमध्ये कांस्यपदक मिळवले.

१८ वर्षांखालील महिला – श्रेष्ठा शेट्टीने लांब उडीमध्ये सुवर्णपदक आणि १०० मीटरमध्ये रौप्य पदक मिळवले.
पुरुष २० वर्षांखालील – निखिल ढाकेने ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले. अली शेखने ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. हर्ष राऊतने १०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळवले. आशिष गोडविन, निखिल ढाके आणि हर्ष राऊत यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले. निखिल ढाके, अली शेख आणि ऋषभ यादव यांनी ४ x ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.

हे ही वाचा:

‘दुर्गापूजा करायची असेल तर अल्लाहच्या नावाने ५ लाख द्या, नाहीतर कापले जाल’

तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची जानी मास्टरची कबुली

पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडल्या ‘लोखंडी सळ्या’

अमेरिका- इंडिया ही नव्या जगाची ‘एआय’ शक्ती

२० वर्षांखालील महिला – चार्वी पावसेने गोळाफेकमध्ये कांस्यपदक मिळवले. अर्पिता गावडेने ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.

श्रेष्ठा शेट्टी म्हणाली, “मी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. आगामी स्पर्धांसाठी मी काम करेन.” अली म्हणाला, “कामगिरी तर चांगली झाली आहे, पण आगामी स्पर्धांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.” “आमच्यासाठी आव्हानात्मक चॅम्पियनशिप होती. कामगिरी समाधानकारक झाली. आमच्याकडे आगामी स्पर्धांमध्ये सुधारणेला चांगला वाव आहे, असे या खेळाडूंचे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी सांगितले.

Exit mobile version