ममता बॅनर्जी यांच्या परभावने तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पिसाळले आहेत. ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत धूळ चरणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांच्या गाडीवर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. हल्दिया येथील मतमोजणी केंद्राबाहेर हा हल्ला करण्यात आला आहे.
साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने सत्ता काबीज केली आहे. तरीही स्वतः ममता बॅनर्जी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागत आहे. ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत आपला पारंपारिक भवानीपूर हा मतदारसंघ सोडून नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. नंदीग्राम हा अधिकारी कुटुंबाचा गड मानला जातो. तरीही ममता बॅनर्जी यांनी तिथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपली सारी ताकद पणाला लावून त्यांनी अधिकारी यांना पराभूत कारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी अटीतटीची लढत दिली. पण अधिकारी यांचा पराभव करण्यात मात्र त्यांना यश आले नाही. १७३६ मतांनी सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे.
हे ही वाचा:
पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला
निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक
योग्य वेळ आली की सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार
ममता यांच्या पराभवाने तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. हे असे प्रकार आणखीनही काही ठिकाणी घडल्याचे बोलले जात आहे. आपली सत्ता सुनिश्चित झाल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हिंसेला सुरुवात केल्याच्या घटना नोंदवल्या जात आहेत.