आसाम तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरा यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल कारण देताना ते म्हणाले, टीएमसीच्या माध्यमातून आपण आसाममध्ये भाजपविरुद्धचा लढा देऊ शकतो. मात्र अनुभवातून हे लक्षात आले की, आसाममधील लोक टीएमसीला स्वीकारण्यास इच्छुक नाहीत. आसाममधील लोक टीएमसीला बंगालचा प्रादेशिक पक्ष म्हणून पाहतात. टीएमसीमध्ये राहिलो तर माझा वेळ आणि शक्ती वाया जाईल, असे बोरा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
बोरा यांनी सांगितले की, टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ममता दीदी यांच्याशी भेट घेण्याचा मी गेल्या दीड वर्षात वारंवार प्रयत्न करूनही मी अयशस्वी झालो आहे. आसाममधील लोक दुसऱ्या राज्यातील पक्ष स्वीकारण्यास आणि टीएमसीला पश्चिम बंगालचा प्रादेशिक पक्ष म्हणून पाहण्यास तयार नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा..
विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई
२२ जणांसह बेपत्ता झालेल्या रशियन हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, १७ मृतदेहही ताब्यात !
राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई पोलीस दलात बदल्यांचे वारे
रिपून बोरा २०२२ मध्ये काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर टीएमसीमध्ये दाखल झाले होते. ममता बॅनर्जी यांनी इतर राज्ये आणि दिल्लीसह राज्य जाळण्याबाबत बोलून आसाममध्ये संताप निर्माण केल्यानंतर काही दिवसांनी रिपुन बोरा यांचा राजीनामा आला. बुधवारी एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी इशारा दिला होता की बंगालमधील अशांततेचे राज्याबाहेर दूरगामी परिणाम होऊ शकतात.
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून पश्चिम बंगालमध्ये आग लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पक्षाचा वापर करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. बंगाल पेटल्यास आसाम, ईशान्य, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीसह इतर राज्येही जळतील, अशी धमकी त्यांनी दिली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आसामला धमकावण्याचे धाडस कसे करू शकता, असा सवाल विचारला होता.