भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात गरिबांच्या पंतप्रधान आवास योजनेचा किंवा सर्वांसाठी घरे देण्याच्या वचनबद्धतेचा उल्लेख नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी १५ एप्रिल रोजी केला होता. मात्र हा आरोप खोटा ठरला आहे.
गोखले यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सन २०१९च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने सन २०२२पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु हे आश्वासन पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले. २०२४च्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने सर्व भारतीयांसाठी घरांचा उल्लेखच केलेला नाही, असा दावा केला होता. मात्र भाजपच्या सन २०१९च्या जाहीरनाम्यातील पृष्ठ क्रमांक ३३मधील मुद्दा क्रमांक आठमध्ये असे आढळून आले की पक्षाने सन २०२२पर्यंत कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे देण्याचे आश्वासन दिले आहे.
विशेष म्हणजे, गोखले यांनी शेअर केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटच्या स्क्रीनशॉटमध्ये याबाबत माहिती नमूद करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ कोटी १२ लाख २४ हजार घरांच्या मागणीच्या तुलनेत आतापर्यंत १ कोटी १८ लाख ६४ हजार घरे मंजूर केली आहेत. यापैकी १ कोटी १४ लाख ११ लाख घरे तयार होत असून ८२ लाख दोन हजार घरे पूर्ण झाली आहेत.
हे ही वाचा:
मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!
“सांगलीबाबत काँग्रेसने, महाविकास आघाडीने मोठी चूक केलीये”
आयरिश टाइम्सला भारतीय राजदूतांकडून सडेतोड उत्तर
हार्दिक पंड्याचे वर्ल्ड कप तिकीट कापणार?
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी ९५ लाखांतर्गत दोन कोटी ५५ लाख घरे घरे बांधण्यात आली आहेत आणि दोन कोटी ९४ लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेची लोकप्रियता पाहता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर केले होते की, पंतप्रधान आवास योजना अतिरिक्त दोन कोटी घरे बांधण्यासाठी आणखी पाच वर्षे चालू ठेवली जाईल.
मात्र तृणमूल खासदाराने दावा केला की, भाजपने २०२४च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सर्व भारतीयांसाठी घरांचा किंवा पंतप्रधान आवास योजनेचा उल्लेखही केलेला नाही. मात्र भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या पान १२वर पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार करण्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. “आम्ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चार कोटींहून गरीब परिवाराच्या राहणीमानात सुधारणा केली आहे. आम्ही या कार्यक्रमाचे दूरगामी लाभ ओळखतो. प्रत्येक गरीब कुटुंबाला दर्जेदार घरे मिळतील, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आता पंतप्रधान आवास योजनेचा आणखी विस्तार करू,” असे भाजपच्या संकल्प पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तृणमूलचे खासदार भाजपच्या सर्व आश्वासनांबद्दल खोटे बोलत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत, हे उघड झाले आहे.