तिकीट नाकारल्याने तृणमूलच्या नेत्यांनी ममतांचे फोटो उतरवले, मोदींचे फोटो लावले!

लवकरच दोन नेते भाजपा प्रवेश करणार

तिकीट नाकारल्याने तृणमूलच्या नेत्यांनी ममतांचे फोटो उतरवले, मोदींचे फोटो लावले!

टीएमसी नेते अर्जुन सिंग हे भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर आहेत.अर्जुन सिंग यांनी स्वतः तसे सांगितले आहे.लोकसभेसाठी बराकपूर मतदारसंघातून टीएमसी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने मी भाजपमध्ये परतणार आहे, असे टीएमसी नेते अर्जुन सिंग यांनी गुरुवारी(१४ मार्च) सांगितले.तसेच सिंग यांनी दावा केला की,
टीएमसीचे बडे नेते भाजपात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार दिव्येंदू अधिकारी हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.गेल्या काही वर्षांपासून खासदार दिव्येंदू अधिकारी टीएमसीपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा:

सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!

मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

अक्षरधाम मंदिर दहशतावादी हल्ल्याचा सूत्रधार घोरीकडून भारताविरोधात युद्ध पुकारण्याची चिथावणी

२०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकून दोन वर्षांपूर्वी तृणमूलमध्ये परतलेले सिंह पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.तसेच भाजपच्या तिकिटावर बराकपूरमधून निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे.अर्जुन सिंह यांनी सांगितले की, मी भाजपमध्ये परतण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली आहे.टीएमसीचे बडे नेते भाजपात येणार आहेत, असा दावा देखील त्यांनी केला. मी बराकपूरमधूनच निवडणूक लढवणार आणि पूर्वीपेक्षा जास्त मतांनी तृणमूलचा पराभव करेन, असा पुनरुच्चार त्यांनी बुधवारी(१३ मार्च) केला होता. तसेच टीएमसीने त्यांचा विश्वासघात केल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, टीएमसीने तिकीट नाकारल्यामुळे संतापलेल्या अर्जुन सिंह यांनी तृणमूलच्या सुप्रीमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे फोटो आपल्या कार्यालयातून काढून टाकले अन त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला.

Exit mobile version