28 C
Mumbai
Thursday, March 13, 2025
घरविशेषक्रिकेटपटूंच्या पायाखालचे ईडन गार्डन स्टेडियमच वक्फने काढून घेतले?

क्रिकेटपटूंच्या पायाखालचे ईडन गार्डन स्टेडियमच वक्फने काढून घेतले?

ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री म्हणतात, हे स्टेडियम वक्फची संपत्ती

Google News Follow

Related

वक्फ बोर्डाकडून अनेक जमिनी, स्थावर मालमत्ता या आमच्याच असा दावा केला जात असताना आता चक्क क्रिकेटचे ऐतिहासिक स्टेडियम म्हणून ज्याची ओळख आहे अशा ईडन गार्डन स्टेडियमवर वक्फ बोर्डाने दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

वक्फ सुधारणा विधेयक केंद्र सरकारने संसदेत मांडल्यानंतर वक्फच्या हडेलहप्पीची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

या वक्फ बोर्डाकडून विविध मालमत्तांवर दावा सांगितला जात आहे. आता तर एका महिला मंत्री वक्फच्या भाषेत बोलत आहेत. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल सरकारमधील मंत्री सिद्दिकुल्ला चौधरी यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्तांबाबत धक्कादायक विधान केले आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील क्रिकेटचं ऐतिहासिक मैदान असलेलं ईडन गार्डन आणि फोर्ट विल्यम इमारत हे वक्फ बोर्ड म्हणजेच मुस्लिमांची मालमत्ता होते, असा अजब दावा सिद्दिकुल्ला चौधरी यांनी केला आहे.

हे ही वाचा:

शेख हसीना पुन्हा पंतप्रधान होत आहेत! 

शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत !

संभलमधील जामा मशिदीसह १० मशिदी होळीनिमित्त ताडपत्रीने झाकणार

संथाल परगण्यात आदिवासी संख्या घटली मुस्लीम संख्या वाढली

चौधरी म्हणतात की, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालनेच वक्फ बोर्डाच्या या मालमत्तांवर कब्जा केला असून त्याच्या बदल्यात १५० रुपये भाडं वक्फ बोर्डाला म्हणे मिळत होते.

ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री असलेल्या सिद्दिकुल्ला चौधरी यांचा हा दावा किती खरा किती खोटा याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
ईडन गार्डन ही खरोखरच वक्फची संपत्ती होती आणि सीएबी त्या मोबदल्यात भाडं द्यायची का, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.

सध्या सीएबी याचा अर्थ क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगाल असा होत असला तरी मंत्री सिद्दिकुल्ला चौधरी ज्या सीएबीबाबत बोलत आहेत. त्याची स्थापना ब्रिटिश काळात झाली होती, असे म्हटले जात आहे. तसेच त्याचं नाव कौन्सिल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ बंगाल किंवा कौन्सिल ऑफ ऍडव्हायजरी बोर्ड असं होतं. याचा उल्लेख हा कलकत्ता इंप्रुव्हमेंट ऍक्ट किंवा सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीच्या रूपातही होतो.

ब्रिटिश सरकराने शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रशासन चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मंडळं बनवली होती. सीएबी त्यापैकीच एक होतं. याचा हेतू प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नियंत्रण आणणं हे होतं. दरम्यान, ब्रिटिश काळात वक्फ संपत्तींचं व्यवस्थापन वक्फ अधिनियम, १९२३ अन्वये होत होतं. मुस्लिमांची धार्मिक स्थळं, मकबरे आणि मालमत्तेची देखभाल करणे हा याचा हेतू होता. त्याकाळात सरकारने जर रस्ते-रेल्वे बांधकामांसाठी कुठलीही जमीन घेतली तर त्याचा योग्य मोबदला दिला जायचा. आता ईडन गार्डन ही वक्फची संपत्ती आहे का आणि त्याचं भाडं ब्रिटिश वक्फ बोर्डाला द्यायचे का, हे मात्र स्पष्ट होत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा