ठाण्यातील हिरानंदानी मेडोज उद्यानाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

ठाण्यातील हिरानंदानी मेडोज उद्यानाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीदिनी ठाणेकरांसाठी एक खुशखबर आली आहे. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील महापालिकेच्या उद्यानाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात येणार आहे. नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी मांडलेल्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली आहे. यामुळे सावरकर प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ ब मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी १६ डिसेंबर २०२० रोजी ठाणे महापालिका आयुक्तांकडे एक प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात अशी मागणी करण्यात आली होती की हिरानंदानी मेडोज समोरील महानगरपालिकेच्या उद्यानास ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ असे नाव देण्यात यावे. ही मागणी प्रभागातील सावरकरप्रेमी नागरिकांकडून नगरसेविका आंब्रे यांच्याकडे करण्यात आली होती. प्रभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊनच नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी यासंबंधीचे लेखी निवेदन ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांना पाठवले होते.

हे ही वाचा:

सावरकर आणि ज्यू नि इस्राएल

राजे, तुम्हाला मराठा आरक्षणाचा ठेका दिलेला नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

चक्रीवादळासाठी केंद्रावर भार नाही; ओडिशा स्वतः करणार तयारी

महापालिका आयुक्तांना प्रस्ताव पाठवल्यानंतर वर्तक नगर प्रभाग समितीच्या बैठकीत हा विषय समाविष्ट करण्यात आला. विशेष म्हणजे सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २७ मे रोजी ही ऑनलाईन पद्धतीने बैठक घेण्यात आली. प्रभाग समितीच्या बैठकीत एक मताने हा प्रस्ताव पारित करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या बैठकीत या नामकरणाला आपला पाठिंबा दर्शवला.

अंदाजे सहा महिन्यापूर्वी या उद्यानाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे यासाठी हिरानंदानी मेडोज परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते. अखेर सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे.

Exit mobile version