आंध्र प्रदेश पोलिसांनी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आमदार मायाना झाकिया खानम आणि इतर दोघांविरुद्ध तिरुमला मंदिरात विशेष वागणूक (व्हीआयपी दर्शन) देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, खानम तिचे जनसंपर्क अधिकारी कृष्णा तेजा आणि आणखी एक व्यक्ती पी चंद्रशेखर यांनी एका व्यक्तीला व्हीआयपी दर्शन आणि वेद आशिर्वाचनम या धार्मिक विधीचे आश्वासन देऊन ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा..
वायनाडमध्ये नव्या हरिदास देणार प्रियांका गांधींना टक्कर!
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे ‘महान राजकारणी’
हमासच्या सिनवारचा नवा व्हीडिओ, बायकोकडे दिसली २७ लाखांची बॅग!
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रवृत्तीबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता
TTD च्या दक्षता अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी एन साई कुमारने तिरुमला मंदिरात VIP दर्शन आणि वेद आशिर्वाचनम तिकीट देण्याच्या बहाण्याने आरोपींना श्रीवारी मंदिराजवळ पैसे दिले. तक्रार मिळाल्यानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वी, अशाच एका प्रकरणात, तिरुमला मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा देणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी ४१ वर्षीय व्यावसायिकाची ६४ हजार रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला तिरुपती मंदिरात व्हीआयपी दर्शन देणारा व्हॉट्सॲप मेसेज आला होता. प्रेषकाने तिरुमला तिरुपती देवस्थानमचा कर्मचारी असल्याची ओळख दिली. व्यापारी राकेश आनंद ललवानी यांनी मेसेजला प्रतिसाद दिला आणि आरोपीने त्याला बुकिंगची रक्कम देण्यास प्रवृत्त केले.
सुरुवातीला लालवानी यांनी ३० हजार रुपये ट्रान्सफर केले आणि नंतर तांत्रिक अडचणींचा हवाला देत त्यांना २९ हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. तसेच पाच हजार रुपयेही जास्तीचे त्यांनी दिले. याप्रकरणी लालवानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.