पवन कल्याण म्हणतात, सनातन धर्म प्रमाणपत्र हवे!

'सनातन धर्म संरक्षण मंडळ' स्थापन करण्याची मागणी

पवन कल्याण म्हणतात, सनातन धर्म प्रमाणपत्र हवे!

तिरुपती बालाजी येथील लाडू वादाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देशभरातील मंदिरांमध्ये प्रसादाची शुद्धता राखण्यासाठी ‘सनातन धर्म प्रमाणपत्र’ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सनातन धर्माविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना आणि संघटना विरोध करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हटले. गुरुवारी (३ऑक्टोबर) तिरुपती येथील एका प्रचार सभेत उपमुख्यमंत्री पवन कल्याण बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले, प्रसादांच्या शुद्धतेसाठी ‘सनातन धर्म प्रमाणपत्र’ आवश्यक आहे. राज्य आणि देश पातळीवर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची गरज आहे. याशिवाय मंडळासाठी दरवर्षी निधी देण्यात यावा. सनातन धर्माला एका सशक्त मंडळाची गरज आहे, जे सनातनच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा कृत्यांना आळा घालेल. तसेच सनातन धर्माचा द्वेष करणाऱ्यांना सहकार्य करू नये, असे कल्याण यांनी म्हटले. आपला धर्म आणि परंपरेचे रक्षण आपल्यालाच करायचे आहे, ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा : 

लाडू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या देखरेखीखाली करणार एसआयटी

पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार, राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक!

नसरल्लानंतर हिजबुल्लाचा संभाव्य नवा प्रमुख हाशिम सफिद्दीनला टिपले

मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात

दरम्यान, तिरुपती प्रसादाच्या लाडू प्रकरणावरून अजूनही वाद सुरुच आहे. या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने आंध्र सरकारला झापले होते. यानंतर प्रसाद भेसळ भेसळ प्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा तपास थांबवला होता. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या हाताखाली एसआयटी करणार आहे.

Exit mobile version