काश्मीरमधील लंगेटमध्ये शुक्रवारी सगळीकडे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा…’ असा गजर सुरु होता.याच कारणही तसच आहे. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक उद्यानात १०८ फूट उंच तिरंगा फडकवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही तीच जागा जेथे १९७६मध्ये लंगेट येथील लोकांनी त्यावेळचा कुख्यात दहशतवादी मकबूल बट्टला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी अमृत महोत्सवांतर्गत घरोघरी तिरंगा मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत काश्मीरमध्ये प्रथमच वेगवेगळ्या ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आला होता. काश्मीरमधल्या जनतेमध्ये राष्ट्रध्वजबद्दलचा अभिमान वाढतच चालला असल्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा आली आहे.
उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथील लंगेट भागात १०८ फूट उंचीवर तिरंगा फडकताना पाहून परिसरातील लोकांना अभिमान वाटत आहे. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत होता. नागरी व्यवस्था आणि लष्कराच्या मदतीने एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. काश्मीरचे विभागीय आयुक्त पी.के. पोल सोबत आलेल्या दोन मुलींनी कळ दाबून तिरंगा फडकवलं. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शाळकरी मुलेही सहभागी झाली होती. काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यापासून परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे यावरून अनुभवायला मिळत होते.
#WATCH | A 108-feet high National Flag installed at Langate Park in Handwara, J&K
The flag has been installed by civil administration with HDFC Bank to instil the spirit of nationalism among the local populace, say Indian Army officials.
(Video source: Indian Army) pic.twitter.com/Yzh0Eubbrd
— ANI (@ANI) October 15, 2022
मकबूल बट्टने नॅशनल लिबरेशन फ्रंटची स्थापना केली होती आणि त्याच्या आघाडीने अनेक काश्मिरींना फसवून त्यांना दहशतवादी बनवले होते. पाकिस्तानमध्ये त्यांना स्फोट आणि लहान शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. मकबूल बट्टने निर्माण केलेल्या या संघटनेने अनेक खून आणि अपहरण केले. पकडल्यानंतर मकबूल बट्टला दिल्लीतील तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. ११ फेब्रुवारी १९८४ रोजी त्याला फाशी देण्यात आली होती लोकांनी मकबूल भटला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर, भारत सरकारने हे उद्यान बनवले आणि ते लँगेटच्या लोकांना भेट म्हणून दिले.