कर्नाटक: टिपू सुलतानच्या फोटोला चपलेचा हार!

मुस्लिम समाजाकडून तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना

कर्नाटक: टिपू सुलतानच्या फोटोला चपलेचा हार!

१८ व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या फोटोला अज्ञात लोकांनी चपलेचा हार घातल्याने बुधवारी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला.मुस्लिम समाजाच्या लोकांनी वाहतूक रोखून हिंसक निदर्शने करत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली.आंदोलकांनी सिरवार शहरात टायरही जाळले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर टिपू सुलतानच्या फोटोवरील चपलेचा हार काढण्यात आला.

पोलिसांनी आंदोलकांना २४ तासांत हल्लेखोरांना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अज्ञातांविरुद्ध रायचूर येथील सिरवार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (३१ जानेवारी) सकाळी काही अज्ञात लोकांनी टिपू सुलतान यांच्या फोटोला चप्पल-बुटांचा हार घातला. यानंतर सकाळी मुस्लिम समाजाचे लोक फोटोजवळ गेले असता एकच गोंधळ उडाला.या घटनेचा व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहे.

हे ही वाचा:

ज्ञानवापी प्रकरणात हिंदूंचा मोठा विजय, मशिदीच्या तळघरातील व्यासजींच्या पूजेला मिळाली परवानगी!

राम मंदिराचे स्वप्न साकार,तिहेरी तलाक,गरिबांना कायम स्वरूपी घरे; राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण!

क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानात असे काय प्यायला की, त्याला उलट्या सुरू झाल्या!

हर्ष गायकरच्या खेळाने दिलीप वेंगसरकर प्रभावित!

या घटनेने मुस्लिम समाजाच्या लोकांनी रायचूर जिल्ह्यातील विविध भागात रस्त्यावर उतरून निदर्शने केली.आंदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड करून तयारही जाळले.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.आंदोलकांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला व २४ तासांच्या आता अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले.पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, मुस्लिम शासक टिपू सुलतानचा वाद जुनाच आहे. २०१६ रोजी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने १० नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस ‘टिपू जयंती’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.तथापि, भाजपने या निर्णयाला विरोध केला आणि २०१९ मध्ये राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते रद्द करण्यात आले

 

Exit mobile version