इस्रायलवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेकडील देशांवर पुन्हा युद्धाचे मळभ दाटले आहे. संयुक्त राष्ट्रे आता हे युद्ध टाळण्याच्या प्रयत्नात आहेत. याच दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रविवारी एक स्मरणपत्र जाहीर करून इराणने बदला घेण्यासाठी इस्रायलवर बळाचा वापर करून केलेली हल्ल्याची कृती आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रतिबंधित आहे, असे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी अमेरिकेनेही तेहरानला या हल्ल्याला जबाबदार ठरवण्यासाठी अमेरिका संयुक्त राष्ट्रांत काम करेल, असा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत गुटेरेस यांनी सदस्य देशांना संबोधित केले. ‘संयुक्त राष्ट्रे कोणतेही राज्याची क्षेत्रीय अखंडता अथवा राजनैतिक स्वातंत्र्याविरोधात बळाचा उपयोग करण्यास विरोध करते,’ असे स्पष्ट करून त्यांनी इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला तसेच, आणखी आक्रमक होऊ नये, असा इशाराही दिला.
हे ही वाचा:
‘मासे, डुक्कर किंवा हत्तीही खा, परंतु त्याचे प्रदर्शन का करता?’
इस्रायल-इराण संघर्षाबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र चिंता!
एमएस धोनीने षटकार खेचावा, असे हार्दिक पांड्यालाच वाटत होते का?
सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची हत्या करणाऱ्याचे रणदीप हुडा याने मानले आभार
‘आता तणाव कमी करण्याची वेळ’
इराणने शनिवारी इस्रायलवर २००हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होते. यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशांनी इराणचा निषेध केला होता. अमेरिकेने इस्रायलच्या सुरक्षेबाबत कटिबद्धता दर्शवली होती. मात्र इस्रायल आणि इराणदरम्यान युद्धाची दाट छाया पसरली असल्याने गुटेरेस यांनी बैठक बोलावून संयुक्त राष्ट्रांची भूमिका मांडली. ‘मध्य पूर्वेकडील देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. येथील नागरिक विनाशकारी संघर्षाच्या वास्तवातील संकटाचा सामना करत आहेत. आता तणाव कमी करण्याची वेळ आहे,’ असे ते म्हणाले.
‘इराणवर कारवाई करा’- अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन
संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेचे उपराजदूत रॉबर्ट वूड यांच्या १५ सदस्यीय समितीला इराणच्या हल्ल्याचा ठाम निषेध करण्याचे आवाहन केले. इराणच्या या कृतीवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी सुरक्षा परिषदेची आहे, असे सांगितले. ‘जर इराण किंवा त्याचे प्रतिनिधी अमेरिकेविरोधात कारवाई करतील किंवा इस्रायलविरोधात कारवाई करतील, तर त्यासाठी इराण जबाबदार असेल,’ असे स्पष्ट केले.