महाराष्ट्रातील महिलांनी जागे होण्याची वेळ!

सुनील राऊत यांच्या महिलाविरोधी वक्तव्यानंतर शायना एनसी यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील महिलांनी जागे होण्याची वेळ!

शिवसेना (उबाठा) नेते सुनील राऊत यांच्यावर मुंबादेवी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांनी जोरदार टीका केली आहे. सुनील राऊत यांनी एका सभेत बोलतना विक्रोळीच्या शिंदे गटाच्या महिला उमेदवाराबद्ल चुकीचे विधान केल्यानंतर शयना एनसी यांनी टीका केली. महाराष्ट्रातील महिलांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे, असे आवाहन केले आहे.

शायना एनसी म्हणाल्या, सुनील राऊत यांची ही सर्वात प्रतिगामी टिप्पणी आहे. एकीकडे ते आम्हाला ‘बकरी’ म्हणतात आणि ‘माल’ शब्द वापरतात. यातून मनातला विचार स्पष्ट होतो, असे त्या म्हणाल्या. एकीकडे आमच्याकडे महिलांचा आदर करणारे पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ‘लाडली बहिन’ योजनेने सशक्त केले आहे आणि दुसरीकडे आमच्याकडे ‘महाविनाश आघाडी’ आहे जिथे कुणीतरी आम्हाला वस्तू म्हणून संबोधत आहे, असे त्या म्हणाल्या.

यावर त्यांनी प्रियांका गांधी यांनी जे मौन बाळगले आहे, त्यावरसुद्धा टीका केली आहे. महिलांचा अनादर करणाऱ्या आघाडीतील नेत्याला काँग्रेस पक्षाने का फटकारले नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. या असंवेदनशील भाष्याविरोधात महाराष्ट्रातील महिलांनी जागे होण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पूर्णपणे गप्प आहे. आम्ही बकरी नाही, आम्ही माल नाही, आम्ही महाराष्ट्राच्या मुली आहोत. आम्ही २० नोव्हेंबरला चोख उत्तर देऊ, असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा : 

‘हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दल मुंबईतील कॅनडाच्या दूतावासासमोर करणार आंदोलन’

२५ नोव्हेंबरपासून अधिवेशन; वक्फ विरोधी विधेयक, ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर चर्चा

‘औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले’

सलमान खानला धमकी देऊन पाच कोटींची मागणी करणाऱ्याला कर्नाटकातून अटक

महाराष्ट्रातील महिला उमेदवारांविरुद्ध नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल निराशा व्यक्त करताना, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की हे “दुर्दैवी” आहे. महाराष्ट्रात, आम्ही पाहिले आहे की अनेक नेते महिला उमेदवारांबद्दल वाईट बोलत आहेत, परंतु हे दुर्दैवी आहे.

दरम्यान, विक्रोळी मतदारसंघातील शिवसेना (UBT) उमेदवार सुनील राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महिला उमेदवाराविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version