बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक महाराष्टाच्या राजकारणात तसेच समाजकारण आणि इतिहासात एक वेगळीच छाप होती. चळवळीत धडाडीचे नेते व न्यायाविरुद्ध आवाज उठवणारे कणखर नेतृत्व म्हणजे टिळक. दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये टिळकांच्या सांगली भेटीला शंभर वर्ष पूर्ण झाली. मृत्यूआधी टिळक सांगलीच्या ज्योतिष संमेलनाच्या निमित्ताने ३ दिवसाच्या सांगली दौऱ्यावर गेले होते. तेथे ‘फोटोग्राफर’ बाबुराव घारपुरे यांनी त्यांचे छायाचित्र टिपले. ते लोकमान्य टिळकांचे पोट्रेट ‘व्यक्तिचित्र’ म्हणून शेवटचे छायाचित्र ठरले, ते आजही छायाचित्र म्हणून सर्वत्र वापरले जाते.
बाबुराव घारपुरे यांच्या पणती स्वाती घारपुरे यांनी ‘त्या’ छायाचित्राची कथा सांगितली. लोकमान्य टिळकांचे १५ फेब्रुवारी आगमन झाले. ते केशवराव छापखाने वकिलांच्या बंगल्यावर मुक्काम होता. छायाचित्रासाठी टिळकांची संमती मिळवली. घारपुरे यांच्या अंगणाच्या बाजूलाच स्टुडिओ होता. दुपारची वेळ होती. खिडकीतून येणारा सोनेरी प्रकाश लोकमान्यांच्या चेहरा उजळवून टाकेल अशा क्षणी छायाचित्र काढायचे होते. ठरल्या प्रमाणे लोकमान्य टिळक खुर्चीत आसनस्थ झाले. टिळकांचा चेहरा सूर्यकिरणांनी उजळून निघाला होता. त्यांची भेदक नजर पकडायची होती. पिळदार जाड मिश्या, पगडी उपरण्यामुळे टिळकांची छबी लांबूनही ओळखली जात असे, अखेर तो क्षण सापडलाच त्याक्षणी टिळकांचे छायाचित्र टिपण्यात आले.
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख
शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या
बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’
शरद पवारांचा हात आणि नेते तुरुंगात!
पुरातही टिळकांचे सहीसलामत वाचले ‘छायाचित्र’
लोकमान्य टिळकांची ही तसबीर शेवटची ठरली. पुढे सहा महिन्यातच त्यांच्यवर मधुमेह आजाराने हल्ला केला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पुढे हेच छायाचित्र न.र.फाटक यांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्रात वापरले. सांगलीच्या महापुरात घारापुरवाडा जलमय झाला होता. मात्र टिळकांचे एकमेव छायाचित्र वाचले, तेही टिळकांच्या विचाराप्रमाणेच….!