28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेष६०० गायींची कत्तल, होम डिलिव्हरी, अलवरच्या बीफ मार्केट मधील खुलासा!

६०० गायींची कत्तल, होम डिलिव्हरी, अलवरच्या बीफ मार्केट मधील खुलासा!

मुख्यमंत्री भजनलाल सरकारची कारवाईला सुरुवात

Google News Follow

Related

राजस्थानच्या अलवरमध्ये गोमांस बाजार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दऱ्याखोऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे सुरु असलेल्या गोमांस बाजारावर राजस्थानच्या भजनलाल सरकारने मोठी कारवाई केली आहे.अलवर जिल्ह्यातील किशनगढबास येथील ब्रिसंगपूर गावात गोहत्या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक उमेशचंद दत्ता यांनी किशनगढबास गाठले आणि गोहत्या परिसरात मोठ्या पोलीस फौजफाट्यासह शोधमोहीम राबवली.पोलिसांकडून किशनगढबास परिसरातील अनेक गावे आणि आसपासच्या जंगलात शोधमोहीम राबवली.तसेच ज्या भागात गोहत्येचा व्यवसाय सुरू होता तेथील बीट कॉन्स्टेबलसह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

हिंदुस्थान लाईव्हच्या बातमीनुसार, निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये एएसआय ज्ञानचंद,बीट कॉन्स्टेबल स्वयं प्रकाश, रविकट आणि हेड कॉन्स्टेबल रघुवीर यांचा समावेश आहे.जेव्हा या ठिकणी सुरु असलेल्या गोमांस बाजाराची छायाचित्रे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली तेव्हा राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली होती.ब्रिसंगपूर गावात गोहत्या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक उमेशचंद दत्ता यांनी आपल्या पोलीस पथकांसह स्वतः छापा टाकला. यावेळी गोमांसाचे अवशेष देखील त्या ठिकाणी मिळाले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.या छापेमारीत अनेकांनी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच १२ दुचाकी आणि एक पिकअप देखील जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलवरच्या किशनगढबास पोलीस स्टेशन परिसरात हा बीफ मार्केट सुरु होता.दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या बिरसंगपूरजवळील रुंध गिडवाडा येथे दिवसाढवळ्या गोहत्या होत असत.मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की, या ठिकाणी दर महिन्याला तब्बल ६०० गायींची कत्तल केली जात होती.येथे दररोज मोठया संख्येने लोक मांस खरेदीसाठी येत असत.तसेच मेवातच्या जवळपास ५० गावांमध्ये मांसाची होम डिलिव्हरी देखील केली जायची.

हे ही वाचा:

कमलनाथ भाजपमध्ये जाणार नाहीत, मात्र नकुलनाथ जाण्याची शक्यता!

टाटा समूहाचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त!

नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीडीपीही ‘इंडिया’तून बाहेर

चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

किशनगढबास पोलीस ठाण्याच्या पोलिसांना या बाजारपेठेची संपूर्ण माहिती होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप पोलिसांवर ठेवण्यात आला. अलवरपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात बीफ बिर्याणी देखील विकली जात असल्याचे सांगण्यात आले.मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की, येथील काही लोक मांस आणि कातडीची विक्री करून महिन्याला चार लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.पोलिसांच्या कारवाईमुळे गावातील जवळपास सर्वच पुरुषांनी पलायन केल्याचे सांगितले जात आहे.गावात फक्त महिला, लहान मुले आणि वृद्ध लोक आहेत.याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून चार पोलिसांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा