दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेरच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अब्दुल कलाम रोड देखील बेरीकेट लावून बंद करण्यात आला आहे. याच ठिकाणी इस्रायलच्या दुतावासांचे निवासस्थान आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवली आहे, पोलिसांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.
इराणने इस्रायलवर काल १८० हून अधिक क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात इस्रायलचे नुकसान झाल्याचे इराणने म्हटले आहे, तर यामध्ये काहीच नुकसान न झाल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. मात्र, या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इराणने आमच्यावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. त्यांना याची भरपाई करावी लागेल, असे इस्रायलने म्हटले आहे.
हे ही वाचा :
दिल्लीत २ हजार कोटी रुपयांचे ५०० किलोहून अधिक कोकेन जप्त!
भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन
मुस्लीम समुदायाच्या वकिलांना न्यायालयाने फटकारले
चाकूचा धाकाने आधी दागिने लुटले नंतर बलात्कार
दरम्यान, इस्रायल आणि इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दुतवासाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी ऍडवायजरी जारी केली आहे. इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देत, सतर्क राहण्याचे आणि तेहरानमधील दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे निर्देश दिले, परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना दिले आहेत.