24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदींच्या ध्यान धारणे दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त

पंतप्रधान मोदींच्या ध्यान धारणे दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त

पर्यटकांसाठी समुद्रकिनारा दोन दिवस बंद

Google News Follow

Related

देशात लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी सुरू असलेल्या प्रचार तोफा गुरुवारी थंडावणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानात मग्न होणार आहेत. देशाच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी येथील रॉक मेमोरियलमध्ये एक दिवस आणि एक रात्र असे दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान करणार आहेत. यावेळी कन्याकुमारी येथे मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे.

माहितीनुसार, नरेंद्र मोदी हे सर्वप्रथम तिरुअनंतपुरमला पोहोचतील आणि तेथून एमआय-१७ हेलीकॉप्टरने कन्याकुमारीला जातील. नरेंद्र मोदी हे त्याठिकाणी साधारणपणे सायंकाळी ४:३५ वाजता पोहोचतील. त्यानंतर तेथून सूर्यास्त पाहून ध्यानाला बसणार आहेत. यानंतर, दोन दिवसाचे ध्यान पूर्ण करून ते १ जूनला दुपारी ३:३० वाजता कन्याकुमारीहून परततील.

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले असून आता केवळ एकच टप्पा बाकी आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४५ तासांच्या ध्यानासाठी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये येथे जातील. यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या ध्यान धारणे दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी सुमारे २ हजार पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येणार आहेत. तसेच दोन दिवस पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तेथे जाण्याची परवानगी नसणार आहे.

हे ही वाचा:

केवढा हा आत्मविश्वास… नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!

पुणे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीऐवजी आईचे घेतले रक्तनमुने!

हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन

सलमान खान गोळीबार प्रकरणी आणखी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

ध्यान करण्यासाठी नरेंद्र मोदींनी विवेकानंद रॉकची निवड का केली?

स्वामी विवेकानंदांना येथेच दिव्य ज्ञान प्राप्त झाली होती, यामुळे हे ठिकाण पंतप्रधान मोदींच्या ध्यानासाठी निवडण्यात आले आहे. भाजपा नेत्याच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदींनी ध्यानासाठी निवडलेल्या या खडकाचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आणि एखाद्या भिक्षुच्या जीवनात गौतम बुद्धांच्या सारनाथ प्रमाणेच या ठिकाणाचेही महत्त्व आहे. विवेकानंद संपूर्ण देशाचे भ्रमण करून येथे पोहोचले, तीन दिवस ध्यानधारणा केली आणि विकसित भारताचे स्वप्न त्यांनी येथूनच पाहिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा