१५ माणसांची शिकार करणारा गडचिरोलीचा नरभक्षक वाघ जेरबंद

१५ लोकांची केली होती शिकार

१५ माणसांची शिकार करणारा गडचिरोलीचा नरभक्षक वाघ जेरबंद

तब्बल १५ लोकांचा फडशा पडणाऱ्या नरभक्षक वाघ जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. सी टी १ असं या नरभक्षक वाघाचं नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून भंडारा जिल्हासह गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात या वाघाने हैदोस घातला होता. १५ जणांचा बळी जाऊनही हा वाघ ताब्यात येत नसल्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं.

सिटी १ वाघ जेरबंद झाल्यामुळं नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गुरुवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील वडसा येथे बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आलं आहे. भंडारा(४) जिल्हासह गडचिरोली (६), गोंदिया (२), नागपूर जिल्ह्यात चंद्रपूर (३) या भागात या नरभक्षक वाघाने १५ लोकांची शिकार केली होती. या वाघाला पकडण्यासाठी वन विभाग महिनाभरापासून प्रयत्न करत होता पण हा वाघ हुलकावण्या देत होता. पावसामुळे देखील त्याला पकडण्याच्या कामात व्यत्यय येत होता. पण गुरुवारी अखेर तो वन विभागाच्या सापळ्यात अडकला.

आज सकाळी वनविभागाच्या सापळ्यात अडकताच शूटरने बेशुद्धीच इंजेक्शन देऊन नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात यश आले. यामुळं नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे. सिटी १ वाघाला पकडल्याचे माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी लोकांची एकच गर्दी केली होती.

हे ही वाचा:

मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

या नरभक्षक वाघाने जवळपास १५ नागरिकांचे बळी घेतले असून त्यातील देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी या वाघाने घेतला आहे . त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. येथील बहुतांश भागात वाघांचा वावर असतो. या सर्व भागात सिटी वाघाची दहशत लोकांमध्ये पसरली होती. लोकांना घराबाहेर पडायलाही भीती वाटत होती. घरातून बाहेर पडलेल्या व्यक्तीयज संधी हल्ला होईल हे सांगता येत नव्हते. त्यामुळे लोक घाबरलेली होती. या वाघाला पकडण्यासाठी लोकांनी वारंवार विनंती केली होती . त्यामुळे सिटी १ वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने गेल्या महिन्यापासून सापळा रचला होता वन विभागाने जंगलात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले होते. त्याला पकडण्यासाठी फॅब्ब्ल ६१ ट्रॅप कॅमेरे लावले होते.

Exit mobile version