चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत, ७२ तासांत २ माणसांची शिकार

ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण

चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत, ७२ तासांत २ माणसांची शिकार

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वाघिणीच्या हल्ल्यात एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

चंद्रपूर परिमंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कुडेसाओली गावातील रहिवासी सदाशिव आंदिरवाडे हे जंगलाजवळील त्यांच्या शेतात काम करत असताना घनदाट जंगलातून वाघिणीने येऊन सदाशिववर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात सदाशिवचा जागीच मृत्यू झाला.

“मृतांच्या नातेवाईकांना प्राथमिक नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आजूबाजूच्या परिसरात पिंजरे लावून शिकार करणाऱ्या वाघिणीला पकडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे,” असे वनविभागाच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.
यापूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यातील हल्दा गावाजवळ रूपा रामचंद्र नावाच्या महिलेला वाघाने ठार केले होते. रूपा दुपारी गावाजवळ तिच्या गुरांसाठी गवत गोळा करत असताना तिच्यावर वाघाने हल्ला केला होता.

हे ही वाचा:

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात एका ५५ वर्षीय महिलेचा वाघाने बळी घेतला होता. ब्रम्हपुरी तालुक्यातील आवलगाव गावात ही घटना घडली. मृत महिला आपल्या शेतात गेली असता झुडपात लपलेल्या वाघाने हल्ला करून तिला ठार केले.

Exit mobile version