तरुणाने शेपटाला छेडले आणि वाघ त्याच्यावर उलटला..नंतर जे झाले ते वाईट होते

महाराष्ट्रातील जळगावमधून हा वाघ मध्य प्रदेशात शिरला होता

तरुणाने शेपटाला छेडले आणि वाघ त्याच्यावर उलटला..नंतर जे झाले ते वाईट होते

वाघाच्या शेपटाशी खेळ केला की अर्थातच त्याचे परिणाम वाईट होतात. पण मध्य प्रदेशात एका तरुणाच्या ही बाब अंगलट आली.

मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील गावात शेतात शिरलेल्या पट्टेरी वाघाला एका तरुणाने छेडले. संतोष (३५) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या शेपटाला काठी टोचण्याचा प्रयत्न करून वाघ त्यावर काय प्रतिक्रिया देतो हे त्याला पाहायचे होते. पण झाले भलतेच.

संतापलेल्या वाघाने या तरुणावर उलटा हल्ला केला आणि त्याच्या मानेवर पंजाने जोरदार प्रहार केला. त्यात तो तरुण रक्तबंबाळ झाला होता. त्याचा संपूर्ण टी शर्ट रक्ताने माखला होता. त्या अवस्थेतच तो तरुण मानेवर दोन्ही हात ठेवून निघाला. मग त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमेवर पट्टी बांधण्यात आली पण नंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसला वेगळा आनंद

मंदिरांवर हल्ले वाढताहेत, नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना काय म्हणाले?

पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर १५ ठिकाणी छापे

वनरक्षकांनी यासंदर्भात सांगितले की, हा वाघ महाराष्ट्रातील जळगावमधून यवल अभयारण्यातून खारगोनमध्ये शिरला होता. जवळपास १०० किमी अंतर कापून तो वाघ तिथे पोहोचला होता. तिथे त्याने शिकार करून तो विश्रांती घेत होता. तेव्हा गावातील लोकांनी त्याला छेडण्यास सुरुवात केली. वनरक्षक वासकेल यांनी याबाबत सांगितले की, या लोकांनी त्याला छेडण्याचा प्रयत्न केल्यावर वाघाने वनरक्षकांपैकी एकावर हल्ला केला. तेव्हा तो वनरक्षक बचावला आणि झाडावर चढला. त्यानंतर हा वाघ एका शेतात तब्बल चार तास बसून राहिला.

त्यावेळी ग्वाला गायवचा संतोष तिथे आला आणि त्याने वाघाची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यात तो जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना ८ लाखांची मदत देण्यात आली आहे. वनरक्षकांनी लोकांना सावधान केले असून त्या वाघाचा सध्या शोध सुरू आहे पण तो सापडत नसल्यामुळे लोकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version