पाच मिनिटांत विकली गेली भारत पाक सामन्याची तिकीटे

पाच मिनिटांत विकली गेली भारत पाक सामन्याची तिकीटे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, मग तो समाना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना क्रिकेटरसिंकांसाठी पर्वणी ठरतो. हे दोन्ही संघ भिडतात, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. तिकीट खरेदीतही तेच दिसून आले. ICC पुरुष T20 विश्वचषक २०२२ मधील भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या पाच मिनिटांत विकली गेली आहेत.

यावेळी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या सामन्यासाठी आयोजकांनी ऑनलाइन तिकीट बुक करण्यास सुरुवात करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सामन्याची सर्व ऑनलाइन तिकिटे अवघ्या पाच मिनिटांत विकली गेली. असा वेडेपणा सामन्यात क्वचितच पाहायला मिळतो. भारत-पाक सामन्यांबद्दल चाहत्यांचा उत्साह नेहमीच शिगेला असतो.

विश्वचषक सामना पाहण्यासाठी आठ लाखांहून अधिक चाहते स्टेडियममध्ये पोहोचतील, अशी आशा आयसीसीने व्यक्त केली आहे. सुरक्षा मापदंडांची पूर्तता करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. भारत पाकिस्तान सामना ज्या मैदानात नियोजित आहे ते स्टेडियम जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे.
आठ लाखापेक्षा जास्त चाहते प्रथमच ऑस्ट्रेलियातील पुरुषांच्या T20 क्रिकेटच्या जागतिक प्रदर्शनास उपस्थित राहतील.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’

काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!

गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…

महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन

टी-20 वर्ल्ड कप २०२२ भारतीय संघाचे सामने ऑस्ट्रेलियात  १६ आक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत.  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला नेहमीच मोठी पसंती मिळत असते. युएईच्या मैदानात झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वाधिक पाहिला गेला होता.

Exit mobile version