सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ट्रेनमधील एक तिकीट परीक्षक एका प्रवाशाला तिकिटावरून मारहाण करत आहे.तिकीट परीक्षक एकामागून एक प्रवाशाला थोबाडीत मारत आहे.तो प्रवासी परीक्षकाला विचारात आहे, सर, मला का मारताय?.तसेच बाकीचे प्रवासी देखील तेच आवाहन करत असताना व्हिडिओमध्ये दिसत होते.पण तिकीट परीक्षक कोणाचेही ऐकून न घेता प्रवाशाला मारहाण करत राहील.या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वापरकर्त्यांनी तिकीट परीक्षकाला फटकारले आणि कारवाईची मागणी केली.अखेर रेल्वेने या प्रकरणाची दखल घेत तिकीट परीक्षकाला निलंबित केले व चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बरौनी-लखनऊ एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १५२०३) मध्ये घडली.प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिकीट परीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गोरखपूर-लखनौ मार्गादरम्यान घडली.आरोपी तिकीट परीक्षकाचे नाव प्रकाश असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमदर्शनी दोषी आढळल्यानंतर त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच व्हिडिओचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल!
भारत जोडो न्याय यात्रेचं अखिलेश यादवांना आमंत्रण नाही; स्वतःची पदयात्रा सुरू करणार
आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन, आत साहेबांचा ‘बड्डे’!
राम भक्ताची होणार संकल्पपूर्ती; राम मंदिरासाठी ३१ वर्षांपासून आहेत अनवाणी
व्हिडिओमध्ये तिकीट परीक्षक प्रवाशाकडे तिकीट मागत मारहाण करत आहे.अनेकांची परीक्षकाला थांबण्याचा सल्ला दिला.परंतु तिकीट परीक्षक प्रवाशाला मारहाण करत राहिला. रागाच्या भरात त्याने व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीवर चपलाही मारल्या.व्हिडिओ व्हारला झाल्यानंतर त्याच्या रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करत निलंबित करण्यात आले आहे.