तिबेटीयन भिक्षूचा चीनमध्ये मृत्यु, फ्रान्समध्ये निदर्शने

तिबेटीयन भिक्षूचा चीनमध्ये मृत्यु, फ्रान्समध्ये निदर्शने

चायनीज तुरूंगात तेंझीन न्यिमा या भिक्खुचा मृत्यु झाल्याचे कळल्यानंतर फ्रान्समधल्या तिबेटी नागरिकांनी चीनी दूतावासासमोर निदर्शने केली.

केवळ १९ वर्षीय तिबेटीयन भिक्खुचा दुर्दैवी मृत्यू चीनच्या तुरूंगातील छळामुळे आणि मारहाणीमुळे झाला. या भिक्खुशी अमानुष व्यवहार चीनच्या तुरूंगात करण्यात आले. त्यामुळे, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्या छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

या निदर्शनांचे आयोजन फ्रिडम ऑफ तिबेट फ्रॉम चायना या संस्थेने केले होते. या संस्थेच्या म्हणण्यानुसार चीनच्या दडपशाहीला भिऊन आम्ही शांत बसणार नाही. या निदर्शनात आंदोलकांनी सोबत तिबेटचे झेंडे आणले होते. चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग आणि त्यांच्या सरकार विरोधातील प्लाकार्ड झळकावले आणि त्यांच्या विरोधातील घोषणा देखील दिल्या.

या आंदोलनासाठी परवानगी देताना स्थानिक प्रशासनाने, केवळ तीस लोकांची परवानगी दिली होती. मात्र, यापेक्षा अधिक तिबेटी लोक तिथे जमले आणि त्यांची संख्या १००च्या वर गेली.

मृत भिक्खु तेंझीन न्यिमा सिचुआन प्रांतातील तिबेटीयन प्रदेश असलेल्या द्झा वोन्पो मोनेस्ट्रीशी निगडीत होता.

प्रशासनाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांच्या समवेत तीन अजून भिक्खुंना स्थानिक सरकारी कार्यालयासमोर स्वतंत्र तिबेटसाठी पत्रकं वितरीत केल्याबद्दल आणि स्वतंत्र तिबेटच्या घोषणा दिल्याबद्दल अटक केली होती. दोनदा अटक झाल्यानंतर मागील वर्षी त्यांची मुक्तता करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांची अवस्था बिकट होती. विविध ठिकाणी इलाज करण्याचे प्रयत्न केल्यानंतर त्यांना कांडझे प्रांतातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर तब्येत खालावत जाऊन या भिक्खुचा मृत्यू ओढावला.

Exit mobile version