कोलकाता येथील एका गृहनिर्माण संस्थेतील लोकांना तृणमूल काँग्रेस सरकारकडून भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान केल्याबद्दल शिक्षा केली जात असल्याची तक्रार शुभम या एक्स वापरकर्त्याने समाज माध्यमावर केली आहे.
त्याने सांगितले की, सेंट्रल कोलकाता येथील बेलेघाटा शेजारच्या ‘सनराईज हाइट्स’च्या बाहेर कचरा टाकला जात होता कारण गृहसंकुलातील ५४३ रहिवाशांनी टीएमसीच्या विरोधात मतदान केले. त्यानंतर लगेचच, तृणमूल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलांजन दास यांनी एक्सवर या घडामोडीला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा..
राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारावे
“देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नसून लढणारा व्यक्ती”
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव जाणार शपथविधीला
पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडही ढेपाळला; अफगाणिस्तानने केली मात
हाऊसिंग सोसायटीच्या बाहेर कचरा टाकण्याच्या कृतीला त्यांनी ‘बदला घेण्याचे अहिंसक साधन’ असे म्हटले. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या या संतापजनक कृतीवर टीका केली आहे. “टीएमसीचे राज्य सरचिटणीस निर्लज्जपणे कोलकाता हाऊसिंग सोसायटीसमोर कचरा टाकण्याची फुशारकी मारतात आणि त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे धाडस करतात, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे लोकांची सेवा करणे आहे का? असा सवाल करून हा प्रकार म्हणजे शुद्ध गुंडगिरी आहे असे त्यांनी म्हटले आहे. समाज माध्यमावरील संतापानंतर नीलांजन दास यांनी त्यांची वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे.