मलाही माझ्या लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, पंतप्रधान झाले भावूक!

माझे सरकार गरिबांना समर्पित, पंतप्रधान मोदी

मलाही माझ्या लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, पंतप्रधान झाले भावूक!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी जनतेला संबोधितही केले. भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावूक झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘अटल आवास योजनेंतर्गत बांधलेली घरे पाहिल्यानंतर मलाही असे वाटले की, मलाही माझ्या लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं.

पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराजांना माझे नमन
पंतप्रधान मोदींनी सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील १५ हजार घरांचं लोकार्पण केलं.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसह आदी मान्यवर उपस्थित केलं.त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संभोधित केलं.पंतप्रधान मोदीं म्हणाले की, ‘पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत आहे. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी ११ दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली. आज एक लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृहप्रवेश होणार आहे.

जनतेच्या टाळ्यांचा कडकडाटासह प्रभू राम नामाच्या घोषणा
पंतप्रधान मोदींच्या भाषणाची सुरुवात झाल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला.लोकांनी प्रभू राम नामाच्या घोषणाही दिल्या.पंतप्रधान मोदींनी सर्वांना आवाहन केले की, सर्वांनी २२ जानेवारी रोजी आपल्या घरी दिवे लावा.तसेच त्यांनी उपस्थित असणाऱ्या सर्वांना आपल्या मोबाईलचे टॉर्च लावण्यास सांगितले.उपस्थित लोकांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला भरगोस प्रतिसाद दिला आणि सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लावले.

मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी
पंतप्रधान आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, जेव्हा मी या प्रकल्पाचा शिल्याणास केला होता तेव्हा मी म्हणालो होतो की, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घराच्या चाव्या देण्यासाठी मी स्वतः येईन.आणि मी आज आलो.आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली.मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!

नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

मणिपूरमधील हिंसाचारात म्यानमारच्या दहशतवाद्यांचाही सहभाग?

माझे सरकार गरिबांना समर्पित
हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, चिंध्या वेचणारे, विडी कामगार, वाहनचालक अशा लाभार्थ्यांना पीएमएवाय-अर्बन योजनेअंतर्गत तयार केलेल्या घरांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.पंतप्रधान मोदी इतके भावूक झाले आणि त्यांनी काही वेळ भाषण थांबवले आणि पाणी पिण्यास सुरुवात केली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘बर्‍याच काळापासून आपल्या देशात गरिबी हटावचा नारा दिला जात होता, पण गरिबी हटली नाही. गरिबांच्या नावावर योजना केल्या, पण त्याचा लाभ गरिबांना मिळाला नाही. मध्यस्थ त्यांच्या हक्काचे पैसे लुटायचे. आधीच्या सरकारांचे धोरण, हेतू आणि निष्ठा या गोत्यात होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘२०१४ मध्ये सरकार स्थापन होताच मी म्हटले होते की, गरिबांना समर्पित करणारे हे माझे सरकार आहे.त्यामुळे गरिबांच्या अडचणी कमी होऊन त्यांचे जीवन सुसह्य होईल अशा योजना आम्ही एकापाठोपाठ एक राबवल्या, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशातील सर्वात मोठी सोसायटी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सोलापूरच्या हजारो गोरगरीबांसाठी आम्ही जी प्रतिज्ञा घेतली होती ती आज पूर्ण होत आहे याचा मला आनंद आहे. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले. हा खरोखर आपल्या सर्वांसाठी एक खास क्षण आहे. आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे की, श्रीरामाच्या आदर्शांवर अनुसरून देशात चांगले प्रशासन व्हावे आणि देशात प्रामाणिकपणाचे राज्य व्हावे. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांच्या प्रयत्नांना प्रेरणा देणारे हे रामराज्य आहे.

 

Exit mobile version