छत्तीसगडमधील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील मऱ्हामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाल्याची बातमी आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन गणवेशधारी महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठ्यांसह नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
छत्तीसगडमधील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील माड भागात माओवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि बीएसएफच्या पथकांनी शोधमोहीम सुरू केली. संयुक्त पथकाच्या शोध मोहिमेदरम्यान पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सूर झाली.
हे ही वाचा :
‘कंगनाला बलात्काराचा अनुभव आहे’ म्हणणाऱ्याला कंगनाने दिले चोख उत्तर!
राजकोट किल्ल्यातील घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त
राजकोट किल्यावरील घटना दुर्दैवी; शिवरायांच्या चरणी डोके ठेऊन शंभर वेळा माफी मागतो
‘ममता बॅनर्जी किम जोंगसारख्या हुकूमशहा’
बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. कारवाई दरम्यान तीन नक्षली महिला ठार झाल्या आहेत, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे, तसेच नक्षली साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. अजूनही अधूनमधून गोळीबार सुरु आहे, संयुक्त पथकाचे सर्व जवान सुरक्षित आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.