‘मुनी की रेती’ या भागात स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण बुधवारी गंगा नदीत बुडाले. हे तिघेही मुंबईतील बोरिवली उपनगरात राहणारे होते. मेलरॉय डांटे, अपूर्वा केळकर आणि मधुश्री खुरसांगे अशी तीन बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून निशा गोस्वामी आणि करण मिश्रा या आपल्या मित्रांसोबत ते १ ऑगस्टला हृषीकेश येथे फिरण्यासाठी आले होते. अपूर्वा हिचा पाय पाण्यात उतरल्यावर घसरला आणि तिला पकडण्याच्या प्रयत्नात बाकीचे दोघेही नदीत बुडाले.
सर्व तरुण – तरुणी मुनी की रेती येथील गंगा व्ह्यू कॉटेजमध्ये राहत होते. बुधवारी दुपारी ते सार्वजण गंगा किनारी फिरण्यासाठी आणि स्नानासाठी गेले होते. दोघे जण किनाऱ्यावर थांबले, तर बाकीचे तिघे पाण्यात गेले. अपूर्वा पाण्यामध्ये असताना तिचा पाय घसरला आणि बाकीचे दोघे तिला वाचवण्यासाठी पुढे गेले आणि काही क्षणात ते मुख्य प्रवाहात सापडून दिसेनासे झाले. त्यावेळी जवळपास कोणीही नव्हते, त्यामुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. असे करण मिश्राने सांगितले.
हे ही वाचा:
आमच्या रवीमुळे गावात ‘प्रकाश’ येईल
बापरे !! ठाण्यात दोन कथित पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
तुम्ही आमच्या मुलींना हरवलंत, म्हणून आम्ही तुमच्या मुलांना हरवलं!
पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा
एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती, परंतु बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली; त्यामुळे शोध मोहीम थांबवून ती गुरुवारी पुन्हा सुरू होईल अशी माहिती मुनी की रेती येथील स्टेशन हाऊस ऑफिसर कमल मोहन सिंग भंडारी यांनी दिली.