छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मोदी सरकारने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय माहिती व प्रसरणमंत्री अनुराग ठाकूर आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वे स्थानकांच्या या पुनर्विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबईतील सीएसएमटीसह नवी दिल्लीतील स्थानक आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी किरकोळ विक्री, कॅफेटेरिया असणार आहे. तसेच मनोरंजन सुविधांसाठी ३६, ७२ तसेच १०८ मीटरचे विशाल छत असेल. या विशाल छताखाली फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा असणार आहे. यासोबतच रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाला शहराशी जोडण्यात येणार आहे. शहराच्या आत असलेल्या स्थानकांमध्ये सिटी सेंटरसारखी जागा असणार आहे.

सध्या देशात जवळपास १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यापैकी ४७ रेल्वे स्थानकांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तर ३२ रेल्वे स्थानकांवर काम सुरू आहे. उरलेल्या स्थानकांचे नियोजन आणि आराखड्याचे काम सुरू असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट

PFI बंदीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; संघावर बंदी हवी!

स्थानकांवर या सुविधा असणार

Exit mobile version