एकाच दिवशी राज्यातील चार पत्रकारांनी घेतला जगाचा निरोप

एकाच दिवशी राज्यातील चार पत्रकारांनी घेतला जगाचा निरोप

देशभर सध्या कोरोनामुळे हजारो नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. अशात गुरूवार, २२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चार पत्रकारांनी एकाच दिवशी या जगाचा निरोप घेतला. यातल्या दोघांच्या मृत्यूला कोरोना कारणीभूत ठरला आहे. तर एकाचे निधन हे हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे. हे चार पत्रकार म्हणजे मोतीचंद बेदमुथा, अशोक तुपे, गिरीश धुळप आणि सोपान बोंगाणे.

उस्मानाबादचे असणारे मोतीचंद बेदमुथा हे उस्मानाबादच्या समय सारथीचे संस्थापक होते. तर उस्मानाबादच्या स्थानिक पत्रकार महासंघाचे ते माजी अध्यक्षही होते. हैदराबाद येथे त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.

सोपान बोंगाणे यांच्या निधनालाही कोरोनाच कारणीभूत ठरला आहे. नागरी प्रश्नाचे अभ्यासक असणारे ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांच्यावर पुण्यात कोरोनाचे उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा निधन झाले.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!

लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट

मोदी सरकारवर टीका ही तर मजबूरी

श्रीरामपुर येथील लोकसत्ताचे पत्रकार अशोक तुपे यांचेही गुरूवारी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना या आधी कोरोना होऊन गेला होता पण त्यातून ते बरे झाले होते.

तर अलिबागचे रहिवासी असणाऱ्या गिरीश धुळप यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे बंधू जयंत धुळप हे देखील पत्रकार आहेत.

कोरोनाच्या या महामारीत आजपर्यंत राज्यातील एकूण १०५ पत्रकारांनी आपले प्राण गमावले आहेत.

Exit mobile version