महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. माहितीनुसार, हेलिकॉप्टर एका खासगी कंपनीचे होते. सध्या पोलीस घटनासाठली दाखल झाले असून या अपघाताची चौकशी केली जात आहे.
माहितीनुसार, पुण्यातील बावधन परिसरात ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले आणि काही वेळातच त्याला अपघात झाला. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. उड्डाणानंतर अवघ्या तीन मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळले. दरम्यान, हेलिकॉप्टरमधील दोन पायलट आणि एका अभियंत्याचा मृत्यू झाला आहे.
Pune helicopter crash | 3 people died in the incident. Senior officials of Pimpri Chinchwad Police are on the spot: Vinay Kumar Choubey, CP of Pimpri Chinchwad https://t.co/nOGB7iTJow
— ANI (@ANI) October 2, 2024
सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
परळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे तीनही टप्पे पूर्ण, सरासरी ६५ टक्के मतदान!
सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!
तिरुपती लाडू प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत सरकारकडून एसआयटी चौकशीला ‘फुल स्टॉप’
दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची ४० दिवसातील पुण्यातील दुसरी घटना आहे. याआधी २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. उर्वरित तीन जणांना गंभीर दुखापत झाली नाही.