मुंबईमधील अंधेरीतून आगीची घटना समोर येत आहे. अंधेरीच्या पश्चिमेत लोखंडवाला परिसरात असलेल्या रिया पॅलेस या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर घरात आग लागली आणि काही क्षणातचं आगीने रौद्ररूप धारण करत पसरायला सुरुवात केली. यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
अंधेरीच्या पश्चिमेत लोखंडवाला परिसरात रिया पॅलेस इमारत आहे. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्या असलेल्या सोनी यांच्या घरात आग लागली. काही वेळातचं आगीने रौद्ररूप धारण केले. यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. वयोवृद्ध दांपत्य आणि एक नोकर यावेळी घरात होते अशी माहिती आहे.
हे ही वाचा:
बेबी पावडरमुळे कर्करोग झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला जॉन्सन अँड जॉन्सनकडून मिळणार नुकसान भरपाई
मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत
मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’
भारताला मिळणार ३१ प्रिडेटर ड्रोन; अमेरिकेशी ३२ हजार कोटींचा करार!
या घटनेत चंद्रकांत सोनी (वय ७६ वर्षे), कांता सोनी (वय ७१ वर्षे) आणि नोकर रवी (वय ३३ वर्षे) अशा तिघांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एका तासामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या फायर कूलिंग चे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. पहाटे लागलेल्या या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.