नारळी पौर्णिमेला मालवणमध्ये बोट उलटून तिघे बुडाले!

बचावलेल्या खलाश्याने दिली घटनेची माहिती

नारळी पौर्णिमेला मालवणमध्ये बोट उलटून तिघे बुडाले!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेली बोट समुद्रात उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ही घटना घडल्याने मालवणमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी (१८ऑगस्ट) रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. गंगाराम आडकर नाव व्यक्तीची ही बोट होती. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली आणि बोट समुद्रात पलटली. बोट समुद्रात पलटी झाल्याने चारही खलाशी समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत बोट मालकासह तिघांचा मृत्यू झाला. तर उर्वरित एकाचा जीव वाचला.

हे ही वाचा :

‘कोलकात्यातील रुग्णालयावर झालेला हल्ला ममता बनर्जी पुरस्कृत’

अनिल देशमुख, संजय राऊतांचे गँग भोजन…नितेश राणेंनी शेअर केले फोटो !

बलात्कार पीडितेचे पालक संतापले! म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील विश्वास उडाला

बाळासाहेबांची इच्छा नव्हती, परंतु उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली !

 

बचावलेल्या खलाशाने पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर त्या तीन खलाशांचा शोध घेण्यात आला. मात्र, तिघांचा शोध घेतला असता नागरिकांना त्यांचा मृतदेह सापडला. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मालवणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version