धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून

धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून

रविवारी ईदची सुट्टी साजरी करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांसमवेत ओमानच्या समुद्रावर फिरायला गेलेल्या सांगलीतील जत येथील म्हामाणे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. हे कुटुंब समुद्रकिनारी फिरत असताना समुद्रात प्रचंड लाटा उसळत होत्या. अचानक आलेल्या या खवळलेल्या समुद्राने माम्हाणे कुटुंबाला आत ओढून घेतले. काही कळायच्या आत कुटुंबातील तिघे जण पाण्यात वाहून गेले. या दुर्घटनेत शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती वाहून गेले आहेत.

खवळलेल्या लाटा या सर्वांना कशा आत घेऊन गेल्या याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेत म्हामने यांच्या पत्नी आणि एक मुलगी सुदैवाने बचावल्या आहेत.

संयुक्त अरब अमिरात येथील एका कपंनी मध्ये अभियंता म्हणून शशिकांत उर्फ विजय माम्हाणे आपली पत्नी सारिका, मुलगा श्रेयस आणि मुलगी श्रुती यांच्या सह ओमान येथे वास्तव्यास आहेत. माम्हाणे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील जतचे राहणारे आहेत. जत येथील प्रसिद्ध वकील राजकुमार माम्हाणे हे त्यांचे बंधू आहेत. रविवारी ईदची सुट्टी साजरी करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांसमवेत ओमानच्या मुघसाईल समुद्रावर फिरायला गेले होते आणि त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

हे ही वाचा:

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

समुद्र किनारी फिरत असताना समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळत होत्या. व्हिडीओ चित्रित करत असतानाच एक मोठी लाट आली आणि या कुटुंबातील काहीजणांना आपल्यासोबत घेऊन गेली. या लाटेत शशिकांत माम्हाणे,
मुलगा श्रेयस आणि मुलगी श्रुती वाहून गेले. या दुर्घटनेत शशिकांत माम्हाणे आणि दोन मुलांचा मृत्यू झाला असून पत्नी सारिका बचावली आहे.

Exit mobile version