आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल) क्रिकेटमधील काही नियम बदलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संबंधित नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. विशेष म्हणजे हे बदल पुढील महिन्यात होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात लागू होणार आहेत.
आयसीसीने कोणते नियम बदलले?
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘सॉफ्ट सिग्नल’ निर्णयाला अलविदा
यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान सॉफ्ट सिग्नलमुळे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. सॉफ्ट सिग्नल नियमाचा वापर थर्ड अंपायर करतात. फिल्ड अंपायर झेल किंवा अन्य निर्णयासाठी थर्ड अंपायरकडे जातात. तेव्हा थर्ड अंपायर सर्व व्हिडीओ आणि कॅमेरा अँगल बघूनही निर्णय घेण्यास अयशस्वी ठरतात तेव्हा ते पुन्हा फिल्ड अंपायरचे मत विचारतात. जर फिल्ड अंपायरने आधीच्या निर्णयात फलंदाजाला बाद घोषित केलं असेल, तर थर्ड अंपायर फिल्ड अंपायरचा अनिर्णाय अंतिम ठरवतात. यामुळे अनेकदा वाद उभे राहिले आहेत.
- फ्लड लाईट्सचा वापर होणार
कमी प्रकाशामुळे अनेकदा कसोटी सामने रद्द करण्यात आले आहेत. मात्र, आता असे न होता वेळेआधी कोणत्याही कारणास्तव मैदानावरील लाईट्स कमी झाल्यास फ्लड लाईट्सचा वापर केला जाणार आहे.
- सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवणार
सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून खेळात व्यत्यय आल्यास सामना अंतिम निकालापर्यंत नेण्यासाठी एक दिवस राखीव असणार आहे.
हे ही वाचा :
जयंत पाटलांना ईडीकडून दुसरं समन्स
तमिळनाडूमध्ये विषारी दारूने १० जणांचा मृत्यू
‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात
कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या
७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहेत. इंग्लंडमधील लंडन येथील ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यात हे नवे नियम लागू होणार असून दोन्ही संघांना नवीन बदलांची माहिती देण्यात आली आहे.