फ्रान्समधून भारतासाठी आणखी तीन राफेल विमानांनी उड्डाण केले आणि आज सुमारे ७००० किमीचा पल्ला पार करून भारतात दाखल झाले आहेत. याबद्दल फ्रान्समधील भारतीय दूतावासाने ट्वीट केले आहे.
सलग उड्डाणे करून येणाऱ्या या विमानांमध्ये युएईमध्ये इंधन भरले जाणार आहे. ही विमाने आज रात्री जामनगर विमानतळावर रात्री १०.३० वाजेपर्यंत उतरणे अपेक्षित आहे.
अतिशय आधुनिक असलेली एकूण २१ राफेल विमाने भारतात दाखल झाली आहेत. अजून पाच राफेल विमाने भारतात एप्रिल महिन्यात येणार आहेत. एकूण ३६ विमाने भारताला देण्यात येणार आहेत.
भारतीय हवाई दलाने आपल्या आधुनिकीकरणाला सुरूवात केली आहे. जुनी मिग सारखी विमाने टप्प्याटप्प्याने हवाई दलातून रद्द करत त्यांची जागा आधुनिक विमाने घेणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिकांचे प्रशिक्षण देखील फ्रान्समध्ये करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे
ठाकरे सरकारकडून दोन दिवस आधीच जनतेचा एप्रिल फुल
इशरतच्या पाठिराख्यांचा पर्दाफाश
नव्या विमानांचे आगमन होणार असल्याच्या वृत्तावर आनंद व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीट करून भारतीय हवाई दलात राफेल समाविष्ट होणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारचे आभार देखील मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज संध्याकाळी अजून तीन राफेल विमाने भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात सामील होत आहेत… देशाच्या हवाई सीमा सुरक्षित करून शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या मोदी सरकारचे त्रिवार अभिनंदन
आज संध्याकाळी अजून तीन राफेल विमाने भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात सामील होत आहेत… देशाच्या हवाई सीमा सुरक्षित करून शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या मोदी सरकारचे त्रिवार अभिनंदन 🙏🙏🇮🇳🇮🇳🌷🌷 pic.twitter.com/zMpKrwzzDs
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 31, 2021