मुंबईतील लोकांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ‘संडे स्ट्रीट’ नावाचा उपक्रम सुरु केला. दर रविवारी मुंबईतील सहा ठिकाणी हा उपक्रम राबवला जातोय. आजचा, ३ एप्रिलचा रविवार या उपक्रमातील दुसराच रविवार आहे. मात्र मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद बघता हा उपक्रम अजून तीन ठिकाणी सुरु करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त पांडे यांनी घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत, २७ मार्च पासून दर रविवारी मुंबईकरांना सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तणावमुक्त, आरोग्यदायी आणि वाहनमुक्त वातावरणात वेळ घालवता यावा म्हणून हा उपक्रम सुरु केलाय. या उपक्रमात मुंबईच्या रस्त्यावर योग, सायकलिंग, स्केटिंग, टेनिस इत्यादी निरोगी आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमासाठी सहा ठिकाणे राखीव ठेवली आहेत. मात्र एका आठवड्यातच मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद पाहता आता यामध्ये आणखी ३ मार्गांची वाढ करण्यात आल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे.
अता #SundayStreets अजून वाढल्या. ह्या रविवारी 3 एप्रिल ला नऊ ठिकाणी. आम्ही @MumbaiPolice तर असणारच आमचा बॅण्ड हि असेल आपण सर्व यावे आणि येणारे रविवार ला आपण #SundayFunday बनवू या pic.twitter.com/8tMWGDjn1P
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 1, 2022
मुंबईकरांसाठी आतापर्यंत, मरीन ड्राईव्ह- दोराभाई टाटा रोड, गोरेगाव-माईंडस्पेसमागील रस्ता, डीएननगर – लोखंडवाला मार्ग,मुलुंड- तानसा पाईपलाईन, विक्रोळी- पूर्व द्रुतगती महामार्ग, वांद्रे- कार्टर रोड हे मार्ग राखीव होते. त्यात आता चेंबूर- चिमनी गार्डन, एम.एच.बी.कॉलनी-आयसी कॉलनी दहिसर पश्चिम वायसीएम गार्डन तसेच समता नगर- ठाकूर व्हीलेज इएमपी सर्कल हे तीन नवीन मार्ग खुले केले आहेत.
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
‘या’ कारणामुळे इन्फोसिस रशियातील सर्व कार्यालये बंद करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून सुरू झाले जातीचे राजकारण
‘संडे स्ट्रीट’ हा मुंबईकरांचा ताण हलका करण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा उपक्रम आहे. याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे नुकतेच सोशल मीडियावर नागरिकांकडून रविवार, सुट्टीच्या दिवशी मुंबईतील रस्ते वाहतूकमुक्त ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई पोलिसांनी तेरा रस्त्यांची निवड केली असून, ते रविवारी वाहतूकमुक्त ठेवण्यात येणार आहेत.