25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषवरळी सी लिंकवर गाड्या धडकल्या तीन मृत्यू

वरळी सी लिंकवर गाड्या धडकल्या तीन मृत्यू

Google News Follow

Related

मुंबईतील वरळीमधून वांद्रे येथे जाणाऱ्या भरधाव वेगातील गाडीने टोल प्लाझा येथे पार्क केलेल्या अनेक गाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन ठार तर सहा जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

‘सी लिंकवरील टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर भरधाव इनोवा गाडीने पहिल्यांदा मर्सिडीझ गाडीला धडक दिली. त्यानंतर या गाडीने आणखी दोन ते तीन गाड्यांना धडक दिली,’ असे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले. या अपघातात मर्सिडिझ आणि इनोव्हासह सहा गाड्यांचा अपघात झाला. तर, अपघातांत तीनजण ठार आणि सहा जखमी झाले.

हे ही वाचा:

ससूनमधील पंचतारांकित सुविधांसाठी ललित पाटील मोजत होता १७ लाख रुपये

अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

‘जखमींपैकी चौघांची प्रकृती स्थिर असून दोघांची चिंताजनक आहे. एका गंभीर जखमीवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अन्य पाच जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. इनोव्हाचा चालकही या अपघातात जखमी झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा