एका शूटरने शुक्रवारी आर्कान्सामधील एका किराणा दुकानात केलेल्या गोळीबारात तीन जण ठार आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांसह १० जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. लिटल रॉकच्या दक्षिणेस ६५ मैल (१०४ किलोमीटर) अंतरावर असलेल्या सुमारे तीन हजार २०० लोकसंख्येच्या फोर्डिस येथील मॅड बुचर किराणा दुकानात सकाळी साडेअकरा वाजता हा गोळीबार झाला. गोळाबार झाल्यानंतर पोलिसांनी संशयित शूटरला गोळ्या घातल्या. यात तो जखमी झाला असला तरी त्याची प्रकृती स्थिर आहे, असे आर्कान्सा विभागाचे सार्वजनिक सुरक्षा संचालक माईक हागर यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, यात जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृतीही स्थिर आहे.
याआधीही अमेरिकेत किराणा दुकानात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. सन २०२२मध्ये एका गोऱ्या नागरिकाने बफेलो सुपरमार्केटमध्ये १० कृष्णवर्णीयांची हत्या केली होती. तर, त्याआधी बोल्डर, कोलोरॅडो, सुपरमार्केट येथे झालेल्या गोळीबारात १० जण मारले गेले होते. गोळीबार दुकानाच्या आत झाला की बाहेर झाला, याचा तपशील पोलिसांनी जाहीर केला नाही.
हे ही वाचा:
इस्रायल-हमासदरम्यान भीषण युद्धाला सुरुवात!
अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या
पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा परकीय चलन साठा ७१.७४ पट मोठा
‘मी इतक्या पुढचा विचार करत नाही’ भारताच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत गंभीर यांची भूमिका
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पार्किंगमध्ये पडलेली दिसली. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये दुकानावरच्या खिडक्यांमध्ये बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याने स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला.
डेव्हिड रॉड्रिग्ज (५८) हे फोर्डिसमधील त्याच्या स्थानिक गॅस स्टेशनवर त्याची गाडीत गॅस भरण्यासाठी थांबले होते, जेव्हा त्यांना जवळच्या विक्रेत्याकडून गोळीबाराचा आवाज ऐकला. सुरुवातीला गोळीबाराचे छोटे आवाज ऐकू आले. त्यानंतर त्यांना किराणा दुकानातून काही जण पार्किंगमध्ये धावताना पाहिले आणि एक व्यक्ती जमिनीवर पडलेली दिसली. गोळीबार तीव्र होण्यापूर्वी त्याने फोनद्वारे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. ‘पोलिस दिसू लागले आणि मग मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या,’ असे डेव्हिड यांनी सांगितले.