भूकंपाच्या तीन धक्क्यांनी नाशिक हादरले

नाशिक वेधशाळेपासून १६ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोरी तालुका भूकंपाचा केंद्रबिंदू

भूकंपाच्या तीन धक्क्यांनी नाशिक हादरले

महाराष्ट्राच्या नाशिकला मंगळवारी तासाभरात तीन भूकंपाचे धक्के बसले. आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद नाही आणि प्रशासनाने लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे. नाशिक वेधशाळेपासून १६ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोरी तालुका हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले

रात्री ८.५८, ९.३४ आणि ९. ४२ वाजता अनुक्रमे ३.४, २.१ आणि १.९ तीव्रतेचे असे एकामागून एक तीन भूकंपाचे धक्के जाणवले. दिंडोरी गाव व परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

प्राथमिक माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, मडकीजांब, हातनोरे, नीलवंडी, जांबुटके, उमराळे, तळेगाव या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. जांबुटके गावात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले.या अगाेदर नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा या भागात काही दिवसांपूर्वी भूकंपाचे साैम्य धक्के बसले हाेते असं जिल्हा आपत्ती विभागानं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणी ईडीची पुन्हा छापेमारी सुरू

प्रचार प्रमुखपदाच्या बेडयांतून ‘गुलाम’ झाले ‘आझाद’

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

भारतीय तोफ, शत्रूला धडकी

 

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. लोकांनी ट्विट करून लिहिले की आकाशातून आवाज आला आणि जमीन हादरली. दुसरीकडे तहसीलदार पंकज पवार यांनी घाबरण्याची गरज नाही, तुम्ही सर्वांनी संयम ठेवावा, असे सांगितले. मात्र एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के ज्या प्रकारे जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळच्या पेठ आणि सुरगाणा तालुक्यात अनेकदा भूकंपाच्या बातम्या येत असतात.

Exit mobile version