मुंबईतील कांदिवली भागात इमारतीला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर इमारतीमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर तीनजण जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीला सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी आग लागली होती. इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुपारी १२ चा सुमारास ही आग लागली होती.
या आगीत अडकलेल्या इतर नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, या आगीत तीन जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. लक्ष्मी बुरा (४० वर्षे), राजेश्वरी भरतारे (२४ वर्षे), रंजन शाह (७६ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. तर ग्लोरी (४३ वर्षे), जोसू रॉबर्ट (८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
हे ही वाचा:
भटक्या कुत्र्यांमुळे डोक्याला इजा होऊन ‘वाघ बकरी चहा’चे संचालक पराग देसाई यांचा मृत्यू
कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी
गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली
बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक करत आहेत.