मुंबईतील ६० हॉस्पिटलांना धमकीचे ईमेल!

पोलिसांकडून शोध सुरु

मुंबईतील ६० हॉस्पिटलांना धमकीचे ईमेल!

मुंबईतील ६० हॉस्पिटलांना धमकीचे ईमेल आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी मीरा-भाईंदर मधील एका हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. त्यानंतर आता तशाच पद्धतीचा धमकीचा मेल मुंबईतील नामांकित ६० हॉस्पिटलांना आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (१७ जून) सकाळी ९. ३० ते १० च्या सुमारास मीरारोड मधील वोक्हार्ट हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. तशाच प्रकारचा मुंबईतील नामंकित अशा एकूण ६० हॉस्पिटलांना धमकीचा मेल आला आहे. हॉस्पिटलमध्ये स्फोटके ठेवण्यात आल्याची माहिती या धमकीच्या मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

हे ही वाचा:

ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी

बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश!

जम्मू-काश्मिरातील रियासी हल्ल्याची तपासणी एनआयएच्या हाती!

मुंबई पोलिसांना याची मिळताच हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. श्वान पथकासह पोलीस संपूर्ण परिसराची तपासणी करत आहेत. अद्याप कोणत्याही प्रकारचे साहित्य हॉस्पिटलमधून आढळून आलेले नाही. परंतु , नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, रुग्णालयातील रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, हॉस्पिटलांना धमकीचे मेल आल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.

Exit mobile version