आरबीआयसह ११ बँकांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल!

गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ई-मेलमध्ये राजीनाम्याची मागणी

आरबीआयसह ११ बँकांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल!

मुंबईतल्या आरबीआय बँकेच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.यानंतर एकच खळबळ उडाली.आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आली आहे.आरबीआयच्या ई-मेल आयडीवर आज २६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हा धमकीचा ई-मेल आला होता.मुंबईतील ११ ठिकाणी बॉम्ब ठेवले असून दुपारी दीड वाजता हा ब्लास्ट होईल अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती.

धमकीच्या ई-मेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.या मेलमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी भारतीय बँकांना लुटल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आमचं पाऊल उचलू अशी धमकी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबई २६/११ हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा पक्ष पाकिस्तानच्या निवडणुकीत

राजोरी-पुंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी

कटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!

सपा खासदार शफीकुर रेहमान याना बाबरी पुन्हा मिळवण्याची हौस!

त्यानंतर आरबीआयने पोलिसांनी याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी त्यांच्या बाँब स्कॉडच्या मदतीने शोध सुरू केला. पण त्यामध्ये काहीही आढळलं नसल्याचं समोर आलं. पण हा मेल कुठून करण्यात आला आणि का करण्यात आला याचा तपास आता पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

Exit mobile version