राहुल गांधींना सुरक्षा द्या, खर्गेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र!

आसाम पोलिसांची बघ्याची भूमिका, मल्लिकार्जुन खर्गे

राहुल गांधींना सुरक्षा द्या, खर्गेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र!

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून भारत जोडो न्याय यात्रेतील राहुल गांधीं आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींची सुरक्षा पुन्हा धोक्यात असल्याचे खर्गे यांनी पत्रात लिहिले आहे.तसेच आसाम पोलीस बघ्याची भूमिका करत असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मणिपूर ते मुंबई अशी १४ जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो यात्रा आसाममध्ये पोहचली.परंतु तेथे काही अनुचित प्रकार घडला.त्यावेळी आसाम पोलिसांनी राहुल गांधी यांच्या संरक्षणात यायला हवे होते.राहुल गांधी याना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे.याशिवाय परिसरात लावण्यात आलेले काँग्रेसचे पोस्टर फाडणे, काँग्रेस पक्षाची यात्रा रोखाने आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख खर्गे यांनी पत्रात केला आहे.हे सर्व काम पोलिसांच्या देखरेख खाली होत असून पोलीस बघ्याची भूमिका करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे.

त्यांनी पुढे लिहिले की, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोशल मीडिया टीम आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी झटापट केली आणि त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. या लोकांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि वाहनांवरील यात्रेचे पोस्टरही फाडले.

हे ही वाचा:

संरक्षण प्रकल्पांमध्ये खर्चवाढ अन् विलंब नको!

इम्रान खान यांना सात प्रकरणांमध्ये जामीन पण; निवडणूक लढवण्याचा मार्ग बंदचं

मृतदेह लपवण्यासाठी लावली आग; ७६ जणांचा होरपळून मृत्यू!

ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या शहाजहान शेखच्या घराचे कुलूप तोडले

खर्गे म्हणाले की, २२ जानेवारी रोजी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ताफा नागाव जिल्ह्यात अडवला, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या सर्व धक्कादायक घटनांदरम्यान, जेव्हा-जेव्हा भाजपचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या जवळ येतात तेव्हा आसाम पोलिस प्रेक्षक राहिले, त्यामुळे काही खोडकर लोकांकडून राहुल गांधी यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करण्यात आला.अमित शहा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून यात्रा नियोजित प्रमाणे पार पडावी, अशी मागणी खर्गे यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. राहुल गांधी किंवा यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना कोणतीही इजा होणार नाही यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, असे खर्गे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटी शहरात प्रवेश नाकारण्यात आला.तेव्हा असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.प्रत्युत्तरात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ज्यामध्ये अनेक काँग्रेस नेते जखमी झाले.विनापरवाना शहरात प्रवेश केल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी राहुल गांधींसह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version