सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु 

सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…

अभिनेता सैफ अली खानवर सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अभिनेत्यावर हल्ला झाला होता. याच दरम्यान, या प्रकरणात पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सैफ अली खानवरील हल्ला हा पहिलाच नसून भारतामध्ये मुस्लिम हिरोंवर हल्ले होत आहेत, असे पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने म्हटले आहे.

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी ही प्रतिक्रिया दिली. फवाद चौधरी म्हणाले, ‘सैफ अली खानवरील हल्ला हा पहिलाच नाही, भारतामध्ये मुस्लिम हिरोंवर हल्ले होत आहे.’ सलमान खानवरही हल्ला झाला होता. हिंदू महासभेने कट रचून सलमानवर हल्ला केला होता, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, जिथे जिथे हिंदी आणि उर्दू भाषा बोलली जाते, तिथे हे सर्व अभिनेते ओळखले जातात. कोणालाही स्वतःला सुरक्षित वाटत नाही. या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्याची निंदा केली पाहिजे. असे फवाद चौधरी यांनी म्हटले.

दरम्यान, सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरु आहे. याच दरम्यान सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये आरोपी हल्ला करून जिन्यावरून उतरताना दिसत आहे. तसेच आरोपीने हल्ल्यापूर्वी १ कोटीची मागणी केल्याची माहितीही समोर आली आहे. सैफच्या घरातील मोलकरणीचीही कसून चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा : 

मुंडे यांच्या गच्छंतिचे दोन संकेत…

महाकुंभ: आतापर्यंत ६.२५ कोटी भाविकांनी संगमात केले स्नान!

सैफचा हल्लेखोर सीसीटीव्हीत दिसला, पायऱ्या उतरतानाचा व्हीडिओ

मोरोक्कोकडून ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचे आदेश ?

 

Exit mobile version