दिल्ली, पाटणासह देशातील ४० विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल!

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

दिल्ली, पाटणासह देशातील ४० विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल!

दिल्ली आणि पाटणासह देशातील ४० विमानतळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर सर्व विमानतळांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, धमकीचे ईमेल आम्हाला मंगळवारी(१८ जून) मिळाले, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

धमकीच्या ईमेलमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पोलीस प्रशासन देखील अशा गोष्टीवंर लक्ष्य ठेवून तपास करत आहेत. परंतु, धमकीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. नुकतेच मुंबईतील देखील ४० हुन अधिक नामांकित हॉस्पिटलांना धमकीचे मेल आले होते. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकास हॉस्पिटलची तपासणी केली. परंतु, पोलिसांना कोणतीही अपरिचित वस्तू आढळली नाही. दरम्यान, आज( १८ जून) पुन्हा तसेच धमकीचे ईमेल विमानतळांना मिळाली आहे.

हे ही वाचा:

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल!

गोहत्येच्या संशयामुळे दोन गटात राडा!

गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!

पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत उकळले ५० लाख रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ४० विमानतळांना धमकीचे मेल मिळाले आहेत. त्यानंतर विमानतळांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जयपूर विमानतळाला धमकीचा मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे विमानतळावर कसून चौकशी केली. विमानतळ व्यवस्थापनाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि सीआयएसएफने परिसराची झडती घेतली. पोलिसांनी सांगितले की, “विमानतळावर कसून चौकशी करण्यात आली, परंतु अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही.” या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एप्रिलमध्येही विमानतळ अधिकाऱ्यांना अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या.

 

Exit mobile version