एमपीएससीचे अनेक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत

एमपीएससीचे अनेक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्रातील एमपीएससीचे बहुसंख्य विद्यार्थी आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये सरकारविषयी संतापाची लाट आहे. त्यामुळेच आता अद्याप पदवी न मिळालेल्या उमेदवारांच्या गटाने लवकरात लवकर नोकरीचे पत्र देण्याची मागणी पुन्हा नव्याने केली आहे. आजही विविध टप्प्यांवर ८ ते १० हजार उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक उमेदवारांचा जीव त्यामुळे टांगणीला लागणे साहाजिकच आहे.

हे ही वाचा:

भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही

ठाकरे सरकारचा रडीचा डाव…१२ भाजपा आमदारांचे निलंबन

ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार

वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप

कोणतीही नोकरी हाती नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. बेरोजगारीमुळे त्यांना कौटुंबिक आणि सामाजिक आघाडी अशा दोन्ही ठिकाणी तोंड द्यावे लागत आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण असूनही बेरोजगार राहणे याचा एक मानसिक ताण आमच्यावर आहे, असे मत उमेदवार मनोज चव्हाण यांनी व्यक्त केले. उपशिक्षणाधिकारी पदासाठी पात्र असलेले चव्हाण म्हणाले की, लोणकर यांची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु एमपीएससीच्या उमेदवारांमध्ये अखेरची मुलाखत किंवा नोकरीच्या प्रतीक्षेत वाट पाहणारे आता खचलेले आहेत.

एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे हा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एमपीएससी परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. ते तातडीने होण्याची गरज आहे. ३१ मार्चपर्यंत सरकारने पदभरतीचा निर्णय स्थगित ठेवला. त्यामुळेही युवकांमध्ये चिंतेचे वातवरण आहे.

Exit mobile version