जम्मू-काश्मीरमधील मौलवी म्हणाले, योगी साहेब ‘राम-राम’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितला अनुभव

जम्मू-काश्मीरमधील मौलवी म्हणाले, योगी साहेब ‘राम-राम’

मोदी सरकार आपल्या मागील १० वर्षीय कामकाजामुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून देश चालवत आहे. मागील १० वर्षीय कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यातीलच एक महत्वाचा निर्णय म्हणजे, जम्मू-काश्मीर मधील कलम-३७० हटवणे. कलम-३७० हटवल्यामुळे विरोधकांनी टीका केली-अजूनही करत आहेत. मात्र, यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बदल झाले आहेत. पूर्वी सारखी आता परिस्थिती राहिलेली नाही. एकेकाळी तरुणांच्या हातामध्ये दगड होते, आता तेच तरुण शिक्षणाकडे वळले आहेत,खेळामध्ये सहभागी होवून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, नोकऱ्यांसाठी धडपडत आहेत, पुरुष-महिला आता कोणाचीही भीती न बाळगता मुक्तपणे संचार करत आहेत. परिसरातील व्यापारीही खुश आहेत, कारण आता रोजची दगडफेक होत नाही, त्यामुळे दुकान बंद करण्याची गरज भासत नाही. याच बदलत्या जम्मूबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला एक अनुभव सांगितला, ज्यामध्ये एक मौलवी त्यांना योगी साहेब ‘राम-राम’ म्हणून आवाज देत आहे.

हरियाणाच्या फरीदाबाद येथे शनिवारी (२८ सप्टेंबर) एका मतदान सभेला संबोधित करताना, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवस जम्मूला गेलो होतो. रॅलीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला हेलिकॉप्टर मधून जायचे होते, पण पाऊस पडत असल्याने विमानतळाबाहेर पडू शकलो नाही आणि आतमधेच थांबलो. त्याचवेळी एका व्यक्तीने मला आवाज दिला ‘राम-राम’, माझा परिचय नसल्याने मी कोणाला ओळखत न्हवतो, तेव्हा परत आवाज आला योगी साहेब ‘राम-राम’, तेव्हा मी वळून पहिले तर मला आवाज देनारी व्यक्ती मौलवी होती.

हे ही वाचा : 

अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…

नाव जाहीर करायला लाज का वाटते ?

हिजबुल्लाचा प्रमुख नसरल्लाचा मृत्यू, संघटनेनेच केले शिक्कामोर्तब

महाराष्ट्रातील निवडणुकांत ‘आमचा महाराष्ट्र, आमचे मतदान’

मौलवीच्या तोंडून ‘राम-राम’ शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मला आठवले की, हा सर्व प्रभाव कलम-३७० हटवल्यामुळे झाला आहे. जे लोक भारताला शाप देत होते, भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत होते, आज त्यांच्या तोंडूनही ‘राम-राम’ निघत आहे. योगी पुढे म्हणाले, लक्षात ठेवा, भारत मजबूत होणार, भाजपही जेव्हा मजबूत होईल तेव्हा, एक दिवस असा येईल की, हे लोक देशभरात रस्त्यावर हरे राम, हरे कृष्णाचे गाणे गाताना दिसतील आणि यासाठी भारतीय जनता पक्ष आवश्यक आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

Exit mobile version