काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लडाखमधील लोकांच्या जमिनी चीनने हिसकावून घेतल्याचा दावा केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.राहुल गांधींच्या दाव्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजप खासदार म्हणाले की,’हिंदी चीनी भाई भाई’चा नारा देणाऱ्या काँग्रेसने आधी आत्मपरीक्षण करावे नंतर बोलावे.
राहुल गांधी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त लडाखला पोहोचले होते. पॅंगॉन्ग त्सो तलाव येथे राहुल यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.लडाखच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी रविवारी म्हणाले की,लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे, त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवं आहे आणि इथे अनेक बेरोजगारीची समस्या आहेत.तसेच चीनने भारताची जमीन हिसकावून घेतली आहे. येथील स्थानिक लोक सांगतात चीनचे सैन्य या भागात घुसून त्यांची चराची जमीन घेतली आहे. एकीकडे प्रधानमंत्री सांगतात की, येथील एक इंचही जमीन हिरावून घेतली नाही, पण हे खरे नाही, तुम्ही इथे कोणालाही विचारू शकता,असे राहुल गांधी म्हणाले.
यावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “हिंदी चीनी भाई भाई’चा नारा देणाऱ्या आणि चीनने ४५ हजार चौरस किमी भूभाग ज्यांच्या काळात गिळकृत केला त्यांनी आधी स्वतःच्या आत डोकावून बघावे नंतर बोलावे.
हे ही वाचा:
दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !
पालघर जिल्हा परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हबीब शेख याना अटक !
फक्त २५ किमी; चंद्राच्या सर्वांत जवळच्या कक्षेत पोहोचले लँडर विक्रम
…आणि रजनीकांत यांनी केला योगी आदित्यनाथांना चरणस्पर्श!
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या चीनने भारतीय जमीन हिसकावून घेतल्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका केली.ते म्हणाले, राहुल गांधी लडाखला गेले आहेत. कुठेही गेले तरी देशविरोधी वक्तव्ये करणे हा त्यांचा स्वभाव बनला आहे असे दिसते.चिनी सैन्याने माघार घ्यावी यासाठी भारतीय सैन्य प्रयत्न करून सुनिश्चित केले आहे. पण राहुल गांधींकडून आम्हाला काय अपेक्षा आहेत? मी त्यांना आवाहन करतो की एक दिवस आपण राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांच्याशी चर्चा करू. परंत्तू नैसर्गिक सुरक्षेवर आपले सैन्य कमकुवत करणारी विधाने करू नये,” असे आयटी मंत्री म्हणाले.
लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी (निवृत्त) म्हणाले की, अशी विधाने करणे चुकीचे आहे आणि चीनशी चर्चा सुरू असताना लोकांनी तसे करणे टाळावे.”मुख्यतः डेमचोक आणि डेपसांग या दोन भागाबाबत चर्चा सुरू आहे. याठिकाणीच गस्त घालण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पण आम्ही हरलो असे म्हणणे चुकीचे ठरेल… पण अशी विधाने करणे चुकीचे ठरेल आणि कोणीही विधान करू नये.